
फोटो सौजन्य: iStock
देशात अनेक उत्तम दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट आणि बजेट फ्रेंडली बाईक्स ऑफर करत असतात. जरी आज भारतीय ग्राहक बजेट फ्रेंडली बाईक्सना जास्त प्राधान्य देत असले तरी सुद्धा कित्येक जणांचे स्वप्न असते की हाय परफॉर्मन्स देणारी बाईक घ्यावी. पण अनेकदा या हाय परफॉर्मन्स बाईक्सच्या किंमती सामन्यांना धडकी भरवणाऱ्या असतात.
देशात काही अशा सुद्धा बाईक्स उत्पादक कंपन्या आहेत, ज्या हाय परफॉर्मन्स बाईक्स उपलब्ध करून देत असतात. कावासाकी ही त्यापैकीच एक आहे. आज कित्येक तरुणांना कवास्कीच्या बाईक्सने भुरळ घातली आहे. आत कंपनी नवीन वर्षात आपल्या बाईक्सवर जबरदस्त डिस्कॉउंट्स देताना दिसत आहे.
निन्जा 300 ही कावासाकीने ऑफर केलेली सर्वात स्वस्त स्पोर्ट्स बाईक आहे. ही एक एंट्री-लेव्हल स्पोर्ट्स बाईक आहे, ज्यावर कावासाकी खूप चांगल्या ऑफर्स देत आहे.
Kawasaki Ninja 500 स्पोर्ट्स बाईक भारतात पूर्णपणे बिल्ट युनिट म्हणून ऑफर केली जाते. या बाईकचे डिझाईन आणि कार्यक्षमता दोन्ही अतिशय उत्कृष्ट आहे.