फोटो सौजन्य: iStock
कार चालवताना आपल्याला अनेक खबरदारी घ्याव्या लागतात. यातीलच खबरदारी म्हणजेच स्टेअरिंग असणारी पक्कड. काही वेळेस तर कारचे स्टेअरिंग अपघाताचे कारण बनू शकते. अनेक वेळा कार चालवताना तिची चांगली हँडलिंग होत नाही. अशा स्थितीत कार वळवताना किंवा रिव्हर्स घेताना खूप त्रास होतो. जर तुम्ही स्टेअरिंग नीट धरले नाही तर तुम्ही अपघातालाही बळी पडू शकता. यामुळेच तुम्हाला तुम्हाला स्टेअरिंग पकडण्याचा योग्य पद्धत ठाऊक असणे गरजेचे आहे.
स्टेअरिंग व्हीलवर आपले हात 9 आणि 3 वाजताच्या स्थितीत ठेवा. याचा अर्थ असा की तुमचा डावा हात स्टेअरिंग व्हीलवर 9 वाजण्याच्या स्थितीत असावा आणि तुमचा उजवा हात 3 वाजण्याच्या स्थितीत असावा. ही पोजीशन तुम्हाला स्टेअरिंगवर सर्वोत्तम कंट्रोल ठेवण्यास मदत करते.
हे देखील वाचा: कारचा वेग कमी करताना क्लच दाबणे गरजेचे आहे का? प्रत्येक कार चालकाने जाणून घ्या
पूर्वी 10 आणि 2 वाजताची पोझिशन सुरक्षित मानली जात होती, पण आता हे जुने झाले आहे. स्टेअरिंग व्हीलला 9 आणि 3 पोझिशनमध्ये धरून ठेवल्याने तुमची कोपर वाकलेली राहते, ज्यामुळे एअरबॅग तैनात केल्यावर तुमच्या हातांना आणि चेहऱ्याला दुखापत होण्यापासून प्रतिबंध होतो.
एका हाताने स्टेअरिंग व्हील कधीही धरू नका, विशेषत: जेव्हा तुम्ही जास्त वेगाने गाडी चालवत असाल. दोन्ही हातांनी स्टेअरिंग व्हील धरून, तुम्ही अधिक स्थिर राहता आणि वाईट परिस्थितीत चांगले नियंत्रण मिळवू शकता.
स्टेअरिंगचा खालचा भाग धरून कार चालवण्याची अनेकांना सवय असते. स्टीयरिंग व्हीलचा खालचा भाग धरून ठेवल्याने कारवरील नियंत्रण गमावण्याचा धोका वाढतो, विशेषत: अचानक वळण घेताना.
स्टेअरिंग व्हील खूप घट्ट धरण्याऐवजी हळूवारपणे धरा. खूप कडक पकडीमुळे स्टेअरिंग कंट्रोल करणे कठीण होते. यामुळे थकवाही येऊ शकतो.
स्टेअरिंग व्हीलला जोरात फिरवण्याऐवजी, मंद आणि हळुवार वेगाने ते फिरवत जावा. त्यामुळे वाहनाचा समतोल राखला जातो.