फोटो सौजन्य: Freepik
भारतात आजही जितकी कार्सची चर्चा होत असते तेवढीच तिच्या नंबर प्लेटची सुद्धा चर्चा होत असते. जर एखादी कार लक्झरी असून सुद्धा तिच्याकडे साधी नंबर प्लेट असेल तर ती इतर कार्समध्ये लक्झरी असून सुद्धा आपला ठसा उमटवू शकत नाही. तर दुसरीकडे असे कित्येक कार मालक असतात ज्यांना आपल्या कारसाठी व्हीआयपी नंबर हवी असते. आपल्या कारला व्हीआयपी नंबर असावा अशी प्रत्येकाचीच हौस असते. अशावेळी मग मनात प्रश्न येतो की व्हीआयपी नंबर प्लेटसाठी कितीचा खर्च अपेक्षित असतो. तसेच यामागची प्रक्रिया कशी असते. चला या प्रश्नांच्या उत्तराबद्दल जाणून घेऊया.
हे देखील वाचा: ‘ही’ मेड इन इंडिया कार आता आफ्रिकेत होणार लाँच, होऊ शकतात महत्वाचे बदल
महिंद्राने 15 ऑगस्ट रोजी भारतात आपली महिंद्रा थार रॉक्स लाँच केली होती. आता कंपनी VIN 0001 नंबर प्लेट असलेल्या आपल्या पहिल्या युनिटचा लिलाव करणार आहे. ज्यासाठी रजिस्ट्रेशन सुद्धा पूर्ण झाले आहे. लिलावाच्या विजेत्याला ‘VIN 0001’ नंबर प्लेट असणारी कार तर मिळेलच. पण त्यावर आनंद महिंद्रा यांच्या स्वाक्षरीचा बॅजही मिळेल. याच प्रसंगावरूनच, आज आपण कारसाठी VIP नंबर कसा बुक करू शकतो याबद्दल जाणून घेणार आहोत.
हे देखील वाचा: ‘या’ किंमतीत Triumph Speed T4 आणि Speed 400 झाली लाँच, जाणून घ्या फीचर्स
व्हीआयपी नंबरसाठी तुम्हाला नेमकी किती रक्कम मोजावी लागेल याबद्दल अंदाज वर्तवणे कठीण आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही 0100, 0111, 0222, 0333, 0444, 0555, 0666, 0777, 0888, 1111, 2222, 3333, 5468, 5468, 5468, 5468, 0333 यासारख्या कोणत्याही नंबरसाठी अर्ज केला तर. तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत खर्च करावा लागू शकतो. एवढेच नाही तर असे अनेक नंबर आहेत ज्यासाठी लोकांना लाखो रुपये खर्च करावे लागतात.