फोटो सौजन्य: IStock
भारतात सध्या अनेक कार्स लाँच होतना दिसत आहे. यातही इलेक्ट्रिक कार्सची संख्या जास्त आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत असल्यामुळे लोकं इलेक्ट्रिक वाहनांना पहिले प्राधान्य देत आहे तर दुसरीकडे आजही काही कार्स अशा आहेत ज्यांच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. यातीलच एक कार म्हणजे मारुती सुझुकीची स्विफ्ट.
मारुती सुझुकी अनेक वर्षांपासून भारतीय ग्राहकांसाठी उत्तोमोत्तम कार्स मार्केटमध्ये लाँच करत आहे. त्यांच्या कार्सना सुद्धा मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये मागणी आहे. पण आता त्यांची भारतात सुपरहिट ठरलेली कार लवकरच आफ्रिकेत लाँच होणार असल्याची चर्चा आहे. मारुती सुझुकी स्विफ्ट असे आफ्रिकेत लाँच होणाऱ्या कारचे नाव आहे.
हे देखील वाचा: ‘या’ किंमतीत Triumph Speed T4 आणि Speed 400 झाली लाँच, जाणून घ्या फीचर्स
नवीन जनरेशन मारुती स्विफ्ट मे 2024 मध्येच भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता ही कार आफ्रिकन मार्केटमध्येही लाँच करण्याची तयारी सुरू आहे. चला जाणून घेऊया, भारतीय व्हर्जनच्या तुलनेत कंपनी ही कार आफ्रिकन बाजारात आणताना कोणत्या प्रकारचे बदल करू शकते.
माहितीनुसार, फक्त राइट हॅन्ड ड्राइव्ह व्हर्जनला आफ्रिकन बाजारपेठेत लाँच केले जाईल, त्यामुळे फारसा बदल होण्याची आशा नाही. पण एक मोठा बदल म्हणून, AGS ला CVT ट्रांसमिशनने बदलले जाऊ शकते. याशिवाय मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये कोणताही बदल होणार नाही.
मारुतीने झेड सिरीज इंजिनसह स्विफ्ट प्रथमच लाँच केली आहे. हेच इंजिन आफ्रिकन बाजारपेठेत लाँच होणाऱ्या स्विफ्टमध्येही वापरण्यात येणार आहे. हे इंजिन 81.58 PS चा पॉवर आणि 111.7 न्यूटन मीटरचा टॉर्क प्रदान करेल.
माहितीनुसार, मारुती स्विफ्टच्या आफ्रिकन व्हर्जनमध्ये सात आणि नऊ इंच इंफोटेनमेंट स्क्रीन पर्यायांसह ऑफर केली जाईल. यासोबतच 15 इंच अलॉय व्हील, प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, डिजिटल क्लायमेट कंट्रोल, पुश बटन स्टार्ट/स्टॉपसह कीलेस एंट्री, क्रूझ कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, एबीएस, ईबीडी, ईएसपी, सहा एअरबॅग्ज यांसारख्या अनेक फीचर्स देण्यात येणार आहेत.
मारुतीची नवीन स्विफ्ट केनिया, मॉरिशस, टांझानिया, युगांडा, बोत्सवाना, झिम्बाब्वे तसेच दक्षिण आफ्रिकेसारख्या आफ्रिकन बाजारपेठांमध्ये निर्यात केली जाईल. विशेष म्हणजे भारतात बनवलेली स्विफ्ट काही काळापूर्वी जपानलाही निर्यात झाली आहे. याशिवाय युरोपातील अनेक देशांमध्येही ही कार पाठवण्यात येते.