फोटो सौजन्य: Social Media
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात नेहमीच बाईक्सची क्रेज पाहायला मिळते. पूर्वीच्या काळी बाईक घेताना फक्त मायलेज या एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केले जायचे. पण आजचा बदलता ग्राहक बाईक घेताना फक्त मायलेज नाही तर बाईकच्या दमदार लूककडे सुद्धा लक्ष केंद्रित करतो. अनेकांना तर आपली बाईक स्पोर्टी लूक मध्ये हवी असते. त्यामुळेच अनेक बाईक उत्पादक कंपनीज आपल्या बाईक्स आकर्षक लूकमध्ये डिझाईन करतात.
नुकतेच Triumph कडून भारतीय बाजारात दोन नवीन बाईक लाँच करण्यात आल्या आहेत. या बाईक्समध्ये किती शक्तिशाली इंजिन आहे. कोणत्या प्रकारची फीचर्स यात दिले आहेत याबद्दल जाणून घेऊया.
ट्रायम्फ कंपनीने भारतात दोन नवीन बाईक लाँच केल्या आहेत. यामध्ये Triumph Speed T4 आणि Speed 400 MY25 यांचा समावेश आहे. यातील नवीन बाईक स्पीड T4 आहे. जर तुम्हाला आरामदायी प्रवास करायला आवडत असेल तर ही बाईक तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकेल. ज्यांना हाय परफॉर्मन्स आवडतो त्यांच्यासाठी Speed 400 ची MY 25 व्हर्जन सादर करण्यात आले आहे.
ट्रायम्फ स्पीड T4 मध्ये 398 cc TR सिरीज इंजिन आहे जे 31 PS चा पॉवर आणि 36 न्यूटन मीटरचा टॉर्क देते. हे कमी आरपीएम आणि जोरात एक्झॉस्ट आवाजात चांगले टॉर्क प्रदान करते. तर, MY 25 Triumph Speed 400 ला त्याच्या 400 cc इंजिनमधून 40 PS पॉवर आणि 37.5 न्यूटन मीटर टॉर्क देखील मिळतो. दोन्ही बाईकमध्ये सहा स्पीड गिअरबॉक्स आहेत.
दोन्ही बाईकमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. स्पीड T4 मध्ये मॅन्युअल थ्रॉटल बॉडी कंट्रोल, स्लिपर क्लच, 43 मिमी टेलिस्कोपिक फोर्क, ड्युअल चॅनल एबीएस, यूएसबी पोर्ट, एलईडी लाईट्स, 17 इंच अलॉय व्हील, मोनोशॉक सस्पेंशन यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. स्पीड 400 MY 25 मध्ये राइड बाय थ्रॉटल, स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल, टॉर्क असिस्ट क्लच, ड्युअल चॅनल एबीएस, एलईडी लाईट्स, डिजिटल मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले यांसारखी फीचर्स आहेत.
ट्रायम्फ स्पीड T4 पर्ल मेटॅलिक व्हाइट, कॉकटेल वाईन रेड आणि फँटम ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच वेळी, स्पीड 400 MY 25 मध्ये चार नवीन रंगांचा पर्याय देण्यात आला आहे ज्यात रेसिंग यलो, पर्ल मेटॅलिक वाई, रेसिंग रेड आणि फँटम ब्लॅक यांचा समावेश आहे.
Triumph Speed T4 कंपनीने 2.17 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत ही बाईक लाँच केली आहे. तर MY Triumph Speed 400 2.40 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत खरेदी करता येईल.