फोटो सौजन्य- अधिकृत संकेतस्थळ
ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये भारतातील अनेक वाहनांचा जगभर डंका वाजत आहेत. भारतीय कंपन्यांच्या कार बाईक यांना भारताप्रमाणेच परदेशातही मोठा ग्राहकवर्ग आहे. आता भारताच्या इलेक्ट्रीक बाईकचा ही परदेशामध्ये बोलबाला होणार आहे. बेंगळुरूमधील इलेक्ट्रिक टू व्हीलर्स उत्पादक अल्ट्राव्हायोलेट ऑटोमोटिव्हने आपल्या F77 Mach 2 इलेक्ट्रिक मोटरसायकलची निर्यात सुरू केली आहे. कंपनीने बेंगळुरूजवळील त्यांच्या जिगानी येथील कारखान्यात आयोजित कार्यक्रमादरम्यान F77 Mach 2 इलेक्ट्रिक मोटरसायकलचा पहिला सेट फ्लॅग ऑफ केला. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी युरोपामध्ये पाठवल्या जाणाऱ्या F77 Mach 2 इलेक्ट्रिक बाईकच्या पहिल्या सेटला हिरवा झेंडा दाखवला.
अल्ट्राव्हायोलेट कंपनीची F77 इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईकची जर्मनी, इटली, तुर्की, स्पेन आदी युरोपातील प्रमुख बाजारपेठांमध्ये निर्यात करण्यात आली आहे. अल्ट्राव्हायोलेट F77 Mach 2 इलेक्ट्रिक बाईकची एक्स शोरुम किंमत ही 2.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि या बाईकचे वैशिष्ट्य म्हणजे ही बाईक एका चार्जवर 323 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते.
संस्थापकांनी केली पोस्ट
अल्ट्राव्हायोलेट कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण सुब्रमण्यम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर इलेक्ट्रिक बाईकच्या पहिल्या निर्यात सेटचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी लिहिले, “कंपनीसाठी हा अभिमानाचा दिवस आहे. आम्ही F77 ची पहिला सेट युरोपमध्ये पाठवत आहोत. हे यश केवळ आमच्या नावावर नाही तर संपूर्ण भारतासाठी आहे.
Make in India, for the world!
Hon’ble Shri. @hd_kumaraswamy Union Minister of Heavy Industries, flagged off our first batch of exports. Watching the F77 – our pride, our vision — begin it’s journey to Europe is a milestone not just for us, but for India.@narendramodi @svembu pic.twitter.com/qxZ4m0Nmni— Narayan_uv (@Narayan_UV) September 24, 2024
F77 बाइक नोव्हेंबर 2022 मध्ये देशांतर्गत बाजारात लॉन्च झाली. ज्यावेळी अल्ट्राव्हायोलेट F77 विकसित करत होते त्यावेळी कंपनीच्या संस्थापकांनी सांगितले होते की, ते ही बाईक केवळ भारतासाठीच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठीही तयार करत आहेत. कंपनी टप्प्याटप्प्याने भारतात आपल्या डीलरशिपचा विस्तार करत आहे.F77 ही बाईक दोन प्रकारात बाजारामध्ये उपलब्ध आहे.
ultraviolette f77 ची किंमत आणि व्हेरिएंट
अल्ट्राव्हायोलेट F77 ची टॉप-एंड व्हेरिएंट F77 Mach 2 Recon ची एक्स शोरुम किंमत 3.99 लाख रुपये आहे. . ही इलेक्ट्रिक बाईक 40 bhp पॉवर आणि 100 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. बाईकचा 10.3 kWh बॅटरी पॅक 211 किमी ते 323 किमीपर्यंत रेंज देऊ शकते, बाईकमध्ये 3 रायडिंग मोड आहेत.
मेड इन इंडिया इलेक्ट्रीक बाईकची परदेशातील निर्यात ही इतर भारतीय बाईक उत्पादकांना प्रेरक ठरणार आहे.