फोटो सौजन्य: Pinterest
महिंद्रा सध्या मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये Scorpio N ऑफर करते. रिपोर्ट्सनुसार, या SUV च्या फेसलिफ्ट व्हर्जनवर काम सुरू असून त्यात काही महत्त्वाचे अपडेट्स पाहायला मिळू शकतात.
नव्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये डिझाइनमध्ये फार मोठे बदल नसतील, पण काही कॉस्मेटिक अपडेट्स दिले जाऊ शकतात. मात्र, फीचर्सच्या बाबतीत मोठी सुधारणा अपेक्षित आहे.
Kia Motors कडून ‘या’ खास Next-Gen कारची तयारी सुरु, केव्हापर्यंत होईल भारतात सादर?
टेस्टिंगदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, या SUV मध्ये आधुनिक आणि प्रगत फीचर्स दिले जाऊ शकतात. यात 10.25 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, अपडेटेड सेंटर कन्सोल, डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरमिक सनरूफ, 360 डिग्री कॅमेरा, तसेच Level-2 ADAS, हाय बीम असिस्ट, आणि स्पीड लिमिट असिस्ट यांसारखी सेफ्टी फीचर्स दिली जाऊ शकतात.
लाँचपूर्वी महिंद्राकडून Scorpio N फेसलिफ्टची जोरदार टेस्टिंग सुरू आहे. या दरम्यान SUV अनेक वेळा रस्त्यावर दिसली असून, त्यातून काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
इंजिनमध्ये कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नाही. यात सध्याचेच 2.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि 2.2 लिटर टर्बो डिझेल इंजिन पर्याय मिळू शकतात. यासोबत 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध असतील. ऑफ-रोडिंग क्षमताही कायम ठेवली जाईल.
कंपनीकडून अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र, अंदाजानुसार ही SUV भारतात 2026 च्या मध्यापर्यंत लाँच होऊ शकते.
लाँचवेळीच अधिकृत किंमत जाहीर केली जाईल. पण सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत फेसलिफ्ट व्हर्जनची किंमत सुमारे 20,000 ते 1 लाखांपर्यंत वाढू शकते.






