फोटो सौजन्य: IStock
सणासुदीच्या हंगामानंतर आता पुढील वर्षीचे वेध ऑटोमोबाईल कंपन्यांना लागले आहेत. दरम्यान काही कंपन्या या वर्ष अखेरीच्या दिवसांमध्येही ग्राहकांना आकर्षक अशा सवलतीच्या ऑफर्स देत आहेत. महिंद्रा कंपनीनेही त्यांचा लोकप्रिय कारवर तब्बल 3 लाख रुपयांपर्यंतची सवलत देऊ केली आहे. जाणून घेऊया याबद्दल
महिंद्रा कंपनी डिसेंबर 2024 मध्ये तब्बल 3.06 लाख रुपयांच्या सवलती आणि फायद्यांसह थार 3-डोर ( Thar 3 Door) आवृत्ती ऑफर करत आहे. जून ते नोव्हेंबर या पाच मिहिन्यात महिंद्रा थार 3-डोर एडिशनची घाऊक स्तरावर 6,500 पेक्षा जास्त युनिट्सची विक्र झाली आहे. त्यामुळे कार विक्रीच्या बाबतीत थार 3 डोरची कामगिरी चांगली आहे. कंपनी या सवलतीच्या ऑफरसह नवीन वर्षाच्या आधी थार 3-डोरची अधिक विक्री करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवल्याचे दिसत आहे. महिंद्राच्या थार कारचे अनेक चाहते आहेत त्यामुळे अशा चाहत्यांना कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.
फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Mahindra 3 Door इंजिन पर्याय
थार 3 डोर ऑफ-रोड कार 3 इंजिन पर्यायांमध्ये ऑफर करण्यात येते. त्यामध्ये एक 152hp, 2.0-लिटर टर्बो-पेट्रोल, दुसरा पर्याय 132hp, 2.2-लिटर डिझेल आणि तिसरा पर्याय 119hp, 1.5-लिटर डिझेल. पहिले दोन पर्याय हे मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि पर्यायी 4×4 टेकसह जोडलेले आहेत. तर 1.5-लिटर डिझेल युनिट केवळ मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते.
Mahindra Thar 4WD सवलत
3-डोर थारच्या 4WD (Four-wheel drive) प्रकारांमध्ये या महिन्यामध्ये एकूण 3.06 लाख रुपयांपर्यंत सवलत आणि फायदे दिले जात आहेत. या वर्षी (2024) फेब्रुवारीमध्ये सादर करण्यात आलेल्या थार अर्थ एडिशनवर सर्वाधिक म्हणजे 3.06 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. अर्थ एडिशनमध्ये एक अनोखी मॅट शेड आहे ज्याला महिंद्राने ‘डेझर्ट फ्युरी’ म्हटले आहे आणि बी-पिलर आणि मागील फेंडर्सवर खास ‘अर्थ एडिशन’ बॅज आहेत. उच्च-विशिष्ट LX हार्डटॉप प्रकारावर आधारित, अर्थ एडिशनची भारतीय बाजारपेठेतील किंमत ही रु. 15.40 लाख ते रु. 17.60 लाख आहे.दरम्यान, 4WD श्रेणीच्या मानक थार मॉडेलवर 1.06 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. त्याची किंमत ही 14.30 लाख रुपये ते 17.20 लाख रुपये इतकी आहे.
महिंद्रा थार 3 डोर 2 WD एडिशन सवलत
महिंद्रा थार 3-डोरच्या 2WD (two-wheel drive) एडिशन डिसेंबरमध्ये 1.31 लाख रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहेत. महिंद्रा पेट्रोलवर चालणाऱ्या 2WD आवृत्तीवर मागील महिन्यापेक्षा 31,000 रुपये अधिक सवलत देत आहे. दरम्यान, डिझेल 2WD आवृत्त्यांवर ऑफर केलेले फायदे 56,000 रुपये आहेत. थार 2WD रेंजची सध्या भारतीय बाजारपेठेतील किंमत 11.35 लाख ते 14.10 लाख रुपये आहे.
महिंद्राच्या थारवरील जबरदस्त सवलतीमुळे ग्राहकांना कार खरेदीसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.