फोटो सौजन्य: YouTube
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी आकर्षित एसयूव्ही लाँच करत असते. नुकतेच कंपनीने स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच 14 ऑगस्टच्या रात्री महिंद्रा थार रॉक्स लाँच केली आहे. या एसयूव्हीचे चाहते ही एसयूव्ही लाँच होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. आता ही एसयूव्ही लाँच झाली असून, कंपनीने याची बुकिंग डेट सुद्धा जाहीर केली आहे.
कंपनीने या 5 डोर एसयूव्हीच्या बुकिंगची तारीखही निश्चित केली आहे. महिंद्रा ऑक्टोबर महिन्यापासून थार रॉक्ससाठी बुकिंग सुरू करेल. यासोबतच कंपनीने या महिन्यापासून ही कार डिलिव्हरी करण्याची योजना आखली आहे.
अनेक जणांकडून महिंद्रा थार रॉक्सच्या बुकिंग डेटबद्दल विचारले जात होते. आता यावर स्वतः कंपनीने बुकिंग डेट जाहीर केली आहे. या नवीन एसयुव्हीची बुकिंग ३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रासाठी हा दिवस खूप विशेष आहे, कारण या दिवशी या कंपनीचा पाया रचला गेला. बुकिंगच्या तारखेच्या घोषणेसोबतच कंपनीने ही माहितीही शेअर केली की कंपनी ऑक्टोबर महिन्यापासूनच या कारची डिलिव्हरी सुरू करेल.
कंपनीने या नवीन एसयूव्हीची डिलिव्हरी करण्यासाठी खास दिवसही निवडला आहे. यासाठी कंपनीने १२ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली असून, या दिवशी देशभरात दसऱ्याचा सण साजरा केला जाणार आहे. यावरूनच समजते आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन कंपनी ग्राहकांना आकर्षित करू पाहत आहे.
तुम्ही महिंद्रा थार रॉक्सची ऑनलाइन बुकिंग सुद्धा करू शकता. यासोबतच या नवीन एसयूव्हीची बुकिंग पॅन इंडिया ब्रँडच्या डीलरशिपवरूनही केली जाऊ शकते. बुकिंग सुरू करण्यापूर्वी कंपनी आपल्या ग्राहकांसाठी थार रॉक्सची टेस्ट ड्राइव्ह सुरू करणार आहे. 14 सप्टेंबरनंतर तुम्ही महिंद्र थार रॉक्समध्ये बसून याची टेस्टिंग करू शकता.
महिंद्रा थार रॉक्सने निवडक व्हेरियंटच्या किंमती जाहीर केल्या आहेत. ही नवी थार भारतीय मार्केटमध्ये 6 व्हेरियंटसोबत आणण्यात आली आहे. या कारचे बेस मॉडेल MX1 आहे, जे पेट्रोल एमटी व्हर्जनसह येत आहे. या व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 12.99 लाख रुपये आहे. तर या वाहनाच्या AX7L डिझेल MT या टॉप-एंड प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 20.49 लाख रुपये आहे.