फोटो सौजन्य: YouTube
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड ही भारतातील आघाडीची SUV निर्माती कंपनी आहे. नुकतेच या कंपनीने लाँच केलेल्या कॉम्पॅक्ट SUV, XUV 3XO वर ग्राहकांनी भरभरून प्रेम बारसविले आहे. दिनांक १५ मे २०२४ रोजी सकाळी 10 वाजता या SUV साठी बुकिंग सुरू झाली होती. या बुकिंगच्या पहिल्या ६० मिनिटांत कारला ५०,००० हून अधिकची बुकिंग मिळाली होती. यावरूनच समजते की मार्केटमध्ये या कारची किती जोरदार हवा आहे.
या रेकॉर्ड तोड विक्रीचे कारण म्हणजे XUV 3XO ची उत्कृष्ट रचना, प्रिमियम इंटिरियर्स, आरामदायी राइड, प्रगत तंत्रज्ञान, जबरदस्त कामगिरी आणि सेफ्टी फीचर्स. ही एसयूवी १६ कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असून, यात गॅलेक्सी ग्रे, रेड, ड्युन बेज, डीप फॉरेस्ट, नेबुला ब्लू प्लस गॅल्व्हानो ग्रे, एव्हरेस्ट व्हाइट प्लस स्टेल्थ ब्लॅक, गॅलेक्सी ग्रे प्लस स्टेल्थ ब्लॅक, स्टेल्थ ब्लॅक प्लस गॅल्व्हानो ग्रे, टँगो रेड प्लस स्टेल्थ ब्लॅक, एव्हरेस्ट व्हाइट, स्टेल्थ ब्लॅक, नेबुला ब्लू, डीप फॉरेस्ट प्लस गॅल्व्हानो ग्रे, ड्युन बेज प्लस स्टेल्थ ब्लॅक, सिट्रिन यलो आणि सिट्रिन यलो प्लस स्टेल्थ ब्लॅक समाविष्ट आहे.
Mahindra XUV 3XO पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या कारचे मायलेज त्याच्या पेट्रोल किंवा डिझेलच्या टाकीवर अवलंबून आहे.
XUV 3XO 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल MT सह 18.89 kmpl,
1.2-लिटर टर्बो-पेट्रोल AT सह 17.96 kmpl,
1.2-लीटर TGDi टर्बो-पेट्रोल MT सह 20.1 kmpl,
1.5-लिटर डिझेल MT सह 20.6 kmpl
1.5-लिटर डिझेल AMT सह 21.2 kmpl.
महिंद्रा कंपनी XUV 3XO मध्ये 10.25-इंच डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल आणि ड्युअल-झोन AC, वायरलेस फोन चार्जर, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि सेगमेंट-फर्स्ट पॅनोरमिक सनरूफ ऑफर करते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यात 6 एअरबॅग्ज, लेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, एक रीअरव्ह्यू कॅमेरा, एक टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), एक 360-डिग्री कॅमेरा आणि ॲडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग आणि लेन-कीप असिस्ट यासारख्या काही प्रगत ड्रायव्हर असिस्ट सिस्टम फीचर्सचा समावेश आहे.