स्वदेशी (‘मेक इन इंडिया, फॉर द वर्ल्ड’) उत्पादनाला चालना देण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत टाटा मोटर्स ग्रुप या भारतातील व्यावसायिक व प्रवासी वाहनांच्या आघाडीच्या उत्पादक कंपनीने कार्स व एसयूव्हींचे उत्पादन करण्यासाठी आज दि. 28 सप्टेंबर 2024 रोजी तामिळनाडूमधील रानीपेट जिल्ह्यातील पनापक्कम येथे नवीन, जागतिक दर्जाच्या उत्पादन प्लांटच्या भूमिपूजन समारोहाचे आयोजन केले.या भूमिपूजन समाहारोस तामिळनाडूचे मुख्यमंत्री थिरू एम. के. स्टेलिन आणि टाटा सन्स व टाटा मोटर्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, या समारोहाप्रसंगी विविध प्रतिष्ठित मंत्री, सार्वजनिक प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, सरकारी अधिकारी आणि टाटा ग्रुपचे वरिष्ठ प्रतिनिधी देखील उपस्थित होते
हे उत्पादन प्लांट टाटा मोटर्स आणि जेएलआरसाठी नेक्स्ट-जनेरशन वेईकल्सचे उत्पादन करेल. आंतरराष्ट्रीय मान्यताकृत हा प्लांट भारतातील व जगभरातील बाजारपेठांच्या गरजांची पूर्तता करेल.
टाटा ग्रुप राष्ट्रनिर्मितीप्रती त्यांच्या योगदानासाठी ओळख
याप्रसंगी मत व्यक्त करत तामिळनाउूचे माननीय मुख्यमंत्री थिरू एम. के. स्टेलिन म्हणाले, “टाटा ग्रुप राष्ट्रनिर्मितीप्रती त्यांच्या योगदानासाठी ओळखली जाते. कंपनीचे तामिळनाडूसोबत सखोल, ऐतिहासिक संबंध आहेत, जेथे गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या राज्यामध्ये त्यांचे अनेक उत्पादन प्लांट्स यशस्वीरित्या कार्यरत आहेत. आम्ही पनापक्कम, रानीपेट येथे नवीन उत्पादन प्लांट उभारण्यासाठी जागतिक दर्जाची ऑटो उत्पादक टाटा मोटर्सचे स्वागत करतो.”
प्लांटमध्ये ५,००० हून अधिक रोजगार संधी
या प्रगत, अत्याधुनिक उत्पादन प्लांटमध्ये ५,००० हून अधिक रोजगार संधी (प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष्ज्ञ) निर्माण करण्याची आणि प्लांटमधील व आसपासच्या भागांतील स्थानिक समुदायांमध्ये भविष्यासाठी सुसज्ज कौशल्ये निर्माण करण्याप्रती योगदान देण्याची क्षमता आहे. याव्यतिरिक्त, हा प्लांट शाश्वततेच्या तत्त्वांद्वारे संचालित असेल आणि कार्यसंचालनांसाठी १०० टक्के नवीकरणीय ऊर्जेचा वापर करेल.
याप्रसंगी मत व्यक्त करत टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले, “आम्हाला पनापक्कमला आमच्या नेक्स्ट जनरेशन कार्स व एसयूव्हींसह इलेक्ट्रिक व लक्झरी वेईकल्सचे हब बनवण्याचा आनंद होत आहे. तामिळनाडू प्रगतीशील धोरणे आणि पात्र व प्रतिभावान कर्मचारीवर्ग असलेले स्थापित ऑटामोटिव्ह हबसह आघाडीचे औद्योगिक राज्य आहे. विविध टाटा ग्रुप कंपन्या येथे यशस्वीरित्या कार्यरत आहेत. आमचा आता अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या शाश्वतता पद्धतींचा वापर करत येथे आमचे प्रगत वेईकल उत्पादन प्लांट निर्माण करण्याचा मनसुबा आहे. महिला सक्षमीकरणावरील फोकसशी बांधील राहत विविध पदांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचे सर्वोच्च प्रमाण असण्याचा आमचा प्रयत्न असेल.”
९००० कोटी रुपयांची गुंतवणूक
टाटा मोटर्स ग्रुप या ग्रीनफिल्ड उत्पादन प्लांटमध्ये जवळपास ९,००० कोटी रूपये गुंतवणूक करणार आहे, जो २५०,००० हून अधिक वेईकल्सच्या वार्षिक उत्पादन क्षमतेसाठी डिझाइन करण्यात आला आहे. उत्पादनाला टप्प्याटप्प्याने सुरूवात होईल आणि पुढील ५ ते ७ वर्षांमध्ये या क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी उत्पादनामध्ये वाढ करण्यात येईल.