फोटो सौजन्य- सोशल मीडिया
भारतातील सर्वात लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या मारुती सुझुकीच्या कारवर वर्षा अखेरीच्या या दिवसांमध्ये विशेष ग्राहकांसाठी एक कमालीची ऑफर बाजारात उपलब्ध आहे. कंपनीच्या मारुती सुझुकी बलेनोवर ( maruti suzuki baleno) एक धमाकेदार सवलत मिळत आहे. मारुती सुझुकी बलेनोची एक वेगळी ओळख आहे. मोठ्या कालावधीनंतर ही प्रीमियम हॅचबॅक देशातील नंबर 1 कार बनण्यात यशस्वी झाली. गेल्या महिन्यात या कारच्या तब्बल 16 हजार 293 युनिट्सची विक्री झाली होती. कंपनी सीएसडी कॅन्टीनच्या मदतीने आपल्या गाड्या देशातील सैनिकांनाही विकत आहे.
CSD म्हणजेच कँटिन स्टोअर्स विभागावर २८ टक्क्यांऐवजी केवळ १४ टक्के जीएसटी आकारला जातो. अशा परिस्थितीत सैनिक कार खरेदी करताना मोठ्या प्रमाणात कर वाचवतात. त्यामुळे त्यांना कार तुलनेने स्वस्तात उपलब्ध होतात. ही बचत 1 लाख रुपयांपर्यंतही असते. जाणून घेऊया मारुती सुझुकी बलेनोच्या कराच्या रक्केमत किती फरक असणार आहे.
करात असणार फरक नेमका किती?
मारुती सुझुकी बलेनोची सिग्मा व्हेरियंटची सुरुवातीची किंमत येथे 5 लाख 90 हजार रुपयांपासून होते. या कारची एक्स-शोरूम किंमत ही 6 लाख 66 हजार रुपये आहे. या बेस व्हेरियंटवर संपूर्ण 76 हजार रुपयांची बचत होईल. CSD आणि मारुती बलेनोच्या एक्स-शोरूम किमतींमध्ये कराचा फरक 76 हजार ते 1 लाख 18 हजार रुपयांपर्यंत आहे.
बलेनोच्या अल्फा व्हेरियंटची CSD किंमत 8.20 लाख रुपये आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 9 लाख 38 हजार रुपये आहे. त्यामुळे या मॉडेलवर 1.18 लाख रुपयांचा कर वाचणार आहे. बलेनोच्या एकूण ७ प्रकारांवर कर वाचवता येणार आहे.
मारुती बलेनो कारची वैशिष्ट्ये
मारुती बलेनो कारच्या वैशिष्ट्यांमध्ये Apple CarPlay आणि Android Auto सह 9-इंच स्मार्टप्ले स्टुडिओ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, OTA अपडेट्स, Arkamys-सोर्स्ड म्युझिक सिस्टम, हेड-अप डिस्प्ले (HUD), क्रूझ कंट्रोल, रियर एसी यांचा समावेश होतो. त्यासोबतही अनेक वैशिष्ट्ये पाहिली जाऊ शकतात.
यासोबत, तुम्हाला कारमध्ये उंची-ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि 6 एअरबॅग मिळतील. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बहुतेक फीचर्स फक्त टॉप कार मॉडेल किंवा वरच्या व्हेरियंटमध्ये दिलेले आहेत.
मारुती बलेनो इंजिन
कारमध्ये 1.2-लिटर 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळेल, जे 89bhp चा जास्तीत जास्त पॉवर आउटपुट आणि 113Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.सीएनजी मोडमध्ये, इंजिन 76bhp पॉवर आणि 98.5Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. मायलेजबद्दल बोलताना कंपनीचा दावा आहे की एक किलो सीएनजी 30.61 किमी पर्यंत मायलेज देते.
ज्या सैनिकांना सध्या कार विकत घ्यायची त्यांना मारुतीच्या बलोनोवर तब्बल लाखोंमध्ये सवलत मिळत असल्याने एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.