फोटो सौजन्य: iStock
देशात अनेक जण बाईक्स वापरताना दिसतात. पूर्वीच्या बाईक्स या अत्यंत साधे असायच्या. पण आता ही स्तिथी बदलली आहे. आता प्रत्येक तरुणाला आपली बाईक उत्तम मायलेजसोबतच स्टायलिश डिझाइन असणारी हवी. ग्राहकांची हीच आवश्यकता लक्षात घेऊन अनेक दुचाकी उत्पादक कंपनी आपल्या बाईक्सचे लूक स्टायलिश आणि आकर्षक ठेवत आहे.
देशात अनेक दुचाकी उत्पादक कंपनी उत्तम बाईक ऑफर करत असते. ऊटीलाच एक आघाडीची कंपनी म्हणजे हिरो मोटोकॉर्प. ही कंपनी देशात अनेक वर्षांपासून विविध सेगमेंटमध्ये उत्तम बाईक्स लाँच करत आहे. परंतु आता कंपनीने आपल्या तीन बाईकचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
किती वर्ष झाल्यानंतर कारचे टायर बदलले पाहिजे? प्रत्येक कार चालकाला ‘ही’ गोष्ट ठाऊक हवीच
Hero MotoCorp ने भारतातील त्यांच्या लाइनअपमधून तीन मॉडेल्स बंद केले आहेत. कंपनीने या बाईक्स त्यांच्या वेबसाइटवरून काढून टाकले आहेत. या बाईक्सच्या यादीत Hero Xpulse 200T 4V, Xtreme 200S 4V आणि Passion Xtec यांचा समावेश आहे. चला या बाईक्सबद्दल जाणून घेऊया.
Hero XPulse 200T 4V ही XPulse 200 4V वर आधारित स्ट्रीट बाईक आहे. त्याच वेळी, ही एक ऑफ-रोड बाईक आहे. याने 199.5cc सिंगल-सिलेंडर, एअर/ऑइल-कूल्ड, फोर-व्हॉल्व्ह इंजिन ऑफर केले, जे 19.1 PS पॉवर आणि 17.35 Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.
या बाईकमध्ये पुढच्या बाजूला एलईडी डीआरएलसह गोल एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेल लॅम्प आणि फुल-एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे . यात इन्स्ट्रुमेंट कन्सोलमध्ये स्पीडोमीटर, टॅकोमीटर, ओडोमीटर, ट्रिप मीटर आणि रिअल-टाइम राइडिंग डेटा डिस्प्ले आहे, ज्याने इनकमिंग कॉल्स आणि एसएमएस अलर्ट आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसाठी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील दिली आहे.
ती एक फुल-फेअर स्पोर्ट्स बाईक होती. यात 199.6 cc इंजिन होते, जे 18.08 PS ची पॉवर आणि 16.15 Nm टॉर्क जनरेट करते. यात क्लिप-ऑन हँडलबार आणि मागील-सेट फूटपेग्स आहेत, ज्यामुळे बाईकला स्पोर्टी आणि कम्फर्टेबल राइडिंग पोस्चर देखील मिळाले. यामध्ये फुल-फेअर डिझाइन आणि स्लीप एलईडी हेडलॅम्पने मोटरसायकलला स्पोर्टी अपील दिले. बाईक 17-इंच चाकांसह आली होती, ज्यामध्ये डायमंड-प्रकारची फ्रेम, टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक आहे.
पॅशनवर आधारित ही कम्युटर बाईक होती. हे पॅशन एक्सटेक ड्रम ब्रेक आणि पॅशन एक्सटेक डिस्क ब्रेक या दोन व्हेरियंटमध्ये आणले गेले. यात 113.2cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्ट इंजिन होते, जे 9.15 PS पॉवर आणि 9.79 Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले होते.
कॉल आणि एसएमएससाठी अलर्ट देण्यासाठी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे. यामध्ये फोनची बॅटरी टक्केवारी, रिअल-टाइम मायलेज, लो-फ्यूल इंडिकेटर, सर्व्हिस रिमाइंडर आणि साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ इंडिकेटर यासारखी माहिती उपलब्ध होती. याशिवाय बाईकमध्ये USB चार्जिंग पोर्ट देखील देण्यात आला आहे.