फोटो सौजन्य: iStock
नवीन वर्ष सुरु होण्यास आता फक्त काहीच आठवड्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे. हे वर्ष नक्कीच ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भरभराटीचं वर्ष होतं. या वर्षी अनेक ऑटो कंपन्यांनी, आपल्या वाहनांमध्ये वेगवेगळे प्रयोग केले, जे ग्राहकांनी स्वीकारले सुद्धा. आता नवीन वर्षात अनेक कंपनी आपल्या दमदार कार्स लाँच करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
येत्या नववर्षात लक्झरी कार उत्पादक कंपनी आपल्या एका नवीन कारसह मार्केटमध्ये हवा करणार आहे. ही 5 सीटर कार आपल्या लूक आणि पेर्फोर्मन्समुळे जास्त चर्चिली जात आहे. मर्सिडीज-बेंझची ही नवीन कार येत्या 9 जानेवारी 2025 रोजी लाँच होणार आहे. याचसोबतच मर्सिडीज G 580 देखील त्याच दिवशी बाजारात दाखल होणार आहे. अमेरिकेनंतर भारत हा पहिला देश आहे जिथे EQS SUV लाँच करण्यात आली आहे.
कोटींच्या किंमतीत विकल्या जाणाऱ्या Mercedes च्या ‘या’ कारमध्ये झाला बिघाड, परत मागवल्या कार्स
मर्सिडीज EQS 450 हे मेबॅच वगळता लाइन-अपमधील दुसरे व्हेरियंट आहे. ही कार 5-सीटर मॉडेलमध्ये येणार आहे. ही कार 122 kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकसह येणार आहे, जे मर्सिडीज 7-सीटर EQS 580 4-Matic SUV मध्ये वापरले गेले आहे.
ही मर्सिडीज इलेक्ट्रिक कार केवळ 31 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते. ही कार चार्ज होण्यासाठी 200 KW चा DC चार्जर वापरावा लागेल. मर्सिडीजचे EQA मॉडेल 70.5 kWh बॅटरी पॅक वापरते आणि EQE 90.5 kWh बॅटरी पॅक वापरते.
या मर्सिडीज कारमध्ये ब्लँक-ऑफ ग्रिल आहे, जी पुढच्या बंपरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या कारमध्ये 21 इंची अलॉय व्हील्स आहेत. या लक्झरी कारच्या इंटिरिअरबद्दल बोलायचे झाले तर एअर कंट्रोल प्लसचे फीचर देण्यात आले आहे. वाहनात 56-इंचाची हायपरस्क्रीन आहे, ज्यामध्ये 12.3-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्रंट पॅसेंजर स्क्रीन आणि 17.7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील आहे. मागील प्रवाशांच्या मनोरंजनासाठी या वाहनात 11.6-इंचाची स्क्रीन देखील आहे.
Kia Syros SUV चा अजून एक टीझर झाला प्रदर्शित, फ्यूचरिस्टिक डिझाइनसह दिसले ‘हे’ फीचर्स
या मर्सिडीज कारमध्ये 5-स्पीकर ऑडिओ सिस्टम, 360-डिग्री कॅमेरा, 5-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि सॉफ्ट क्लोज डोअर देखील आहेत. कारमधील लोकांच्या सुरक्षिततेचीही काळजी घेण्यात आली आहे. या कारमध्ये लेव्हल-2 ADAS आणि 9 एअरबॅग्ज दिल्या जाऊ शकतात.
मर्सिडीज EQE च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर या कारची किंमत 1.59 कोटी रुपये आणि EQS SUV ची किंमत 1.61 कोटी रुपये आहे. त्याच वेळी, या मर्सिडीज कारची किंमत या दोन वाहनांच्या किंमतीच्या रेंजमध्ये येऊ शकते.ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकते.