
Montra Super Auto Electric Three Wheeler Launch (फोटो सौजन्य-AI एआय)
चेन्नईस्थित मॉन्ट्रा इलेक्ट्रिकने भारतीय Electric Auto मार्केटमध्ये आपले नवीन Montra Super Auto व्हेरिएंट लाँच केले आहे. या Electric Three Wheeler ची एक्स-शोरूम किंमत ₹3.97 लाख ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नवीन Montra Electric Auto मध्ये 10.6kWh बॅटरी आणि 10kW मोटर देण्यात आली असून, एका चार्जमध्ये 180Km पेक्षा जास्त रिअल-वर्ल्ड रेंज मिळण्याचा कंपनीचा दावा आहे. प्रवासी वाहतूक करून रोजची कमाई करणाऱ्या चालकांना डोळ्यासमोर ठेवून या मॉडेलमध्ये आरामदायी केबिन आणि चालकांच्या सोयीच्या फीचर्सवर भर देण्यात आला आहे.
180Km पेक्षा जास्त रेंज आणि 10kW मोटर
नवीन मॉन्ट्रा सुपर ऑटोमध्ये 10kW क्षमतेची परमनंट मॅग्नेट मोटर देण्यात आली आहे. ही मोटर 60Nm पीक टॉर्क निर्माण करते. यामध्ये 10.6kWh क्षमतेचा बॅटरी पॅक मिळतो. कंपनीच्या दाव्यानुसार, ही Electric Auto Rickshaw एका चार्जमध्ये 180Km पेक्षा जास्त अंतर पार करू शकते. त्यामुळे शहरातील प्रवासी वाहतुकीसोबत दिवसभर अनेक फेऱ्या मारणाऱ्या चालकांसाठी हे वाहन उपयोगी ठरू शकते.
चार्जिंगसाठी 40A ऑफ-बोर्ड चार्जर देण्यात आला आहे. या चार्जरच्या मदतीने बॅटरी पूर्ण रिकामी अवस्थेतून 100% चार्ज होण्यासाठी 5 तास 30 मिनिटे लागतात. त्यामुळे रात्री वाहन चार्जिंगला लावून सकाळी कामासाठी बाहेर पडणे शक्य होऊ शकते.
Kinetic DX Electric Scooter ची 7,000 युनिट्स विक्री! 132 km रेंज, 3.1 kWh बॅटरीसह ग्राहकांची पसंती
चढावावरही मिळणार चांगला आधार
या Montra Super Auto EV मध्ये 32% ग्रेडेबिलिटी देण्यात आली आहे. म्हणजेच चढाच्या रस्त्यांवर वाहन चालवण्यास मदत मिळते. हिल होल्ड असिस्टमुळे चढावर वाहन थांबवल्यानंतर ते मागे सरकण्यापासून रोखले जाते. याशिवाय रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, रिव्हर्स असिस्ट आणि पार्क असिस्टसारखी फीचर्स मिळतात.
चालकांना Eco, Drive आणि Power असे 3 ड्रायव्हिंग मोड निवडता येतात. वाहनात इंटिग्रेटेड LED लाइटिंग, केबिन लाइट आणि हायड्रॉलिक शॉक अॅब्झॉर्बरसह डबल-फोर्क कॉइल स्प्रिंग फ्रंट सस्पेन्शन देण्यात आले आहे. 120/80 R12 रेडियल ट्यूबलेस टायर्समुळे रस्त्यावर चांगली पकड मिळण्यास मदत होते. मागच्या बाजूला उघडता येणारा टेलगेट असलेला सामान ठेवण्याचा कप्पाही देण्यात आला आहे.
Bajaj Chetak EV ची 10 लाख विक्री पार! इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये बजाजचा मोठा टप्पा
किंमत, रंग आणि विक्री नेटवर्क
नवीन मॉन्ट्रा सुपर ऑटो 5 रंगांमध्ये खरेदी करता येईल. यामध्ये One Montra अॅपची सुविधाही देण्यात आली आहे. या अॅपमधील कनेक्टेड फीचर्सची सविस्तर माहिती कंपनीने दिलेली नाही.
Montra Super Auto Price ₹3.97 लाख (एक्स-शोरूम) आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, भारतभर तिचे विक्री, सर्व्हिस आणि स्पेअर पार्ट्सचे 100 पेक्षा जास्त आउटलेट्स आहेत. टीआय क्लीन मोबिलिटीच्या मॉन्ट्रा इलेक्ट्रिक विभागाचे ई-3 व्हीलर सीईओ दीपेंद्र शर्मा यांनी चालकांच्या गरजा लक्षात घेऊन हे व्हेरिएंट तयार केल्याचे सांगितले. त्यामुळे इलेक्ट्रिक प्रवासी रिक्षा खरेदी करू इच्छिणाऱ्या चालकांसाठी हे नवीन मॉडेल एक आकर्षक ऑप्शन ठरू शकते.