फोटो सौजन्य: @iguddugufran/ X.com
Bajaj WEGO रेंजमध्ये ग्राहकांच्या गरजेनुसार अनेक पर्याय उपलब्ध आहेत. P50 मॉडेलच्या P5009 व्हेरिएंटची किंमत 3,11,908 रुपये असून, ते एकदा चार्ज केल्यावर सुमारे 213 किमीपर्यंत धावते. P5012 व्हेरिएंट 272 किमी रेंज देते आणि त्याची किंमत 3,69,301 रुपये आहे.
P70 मॉडेलमध्ये P7009 व्हेरिएंटची किंमत 3,23,001 रुपये असून, त्याची रेंज 182 किमी आहे. तर P7012 व्हेरिएंट 259 किमीपर्यंत धावते आणि त्याची किंमत 3,63,062 रुपये आहे.
सर्वाधिक रेंज देणारे P90 मॉडेल असून, त्याचे P9018 व्हेरिएंट सुमारे 296 किमीपर्यंत चालते. याची किंमत 4,48,303 लाख रुपये आहे. कार्गो सेगमेंटमध्ये C90 मॉडेलच्या C9009 व्हेरिएंटची किंमत 3,87,371 लाख रुपये असून, त्याची रेंज 149 किमी आहे. C9012 व्हेरिएंट 207 किमीपर्यंत धावते आणि त्याची किंमत 4,34,128 लाख रुपये आहे.
Volkswagen Taigun : आता सेफ्टीची चिंता सोडा; 75 टक्के बायबॅक गॅरंटीसह जबराट SUV लॉन्च
Bajaj WEGO चे इलेक्ट्रिक तीनचाकी त्यांच्या सेगमेंटमध्ये प्रगत तंत्रज्ञानासाठी ओळखले जातात. मोठे आणि मजबूत डिझाइन असल्यामुळे प्रवासी आणि मालासाठी अधिक जागा उपलब्ध होते. यात मोनोकोक चेसिस आणि मेटल बॉडीचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे टिकाऊपणा वाढतो.
फीचर्समध्ये ऑल-एलईडी लाइट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि यूएसबी चार्जिंग पोर्टचा समावेश आहे. तसेच हिल होल्ड असिस्ट, पार्क असिस्ट आणि रोल-ओव्हर डिटेक्शनसारखी सेफ्टी फीचर्सही देण्यात आली आहेत. यामध्ये Eco, Power आणि Climb असे तीन राइडिंग मोड्स आहेत. 17.7 kWh पर्यंतची मोठी बॅटरी देण्यात आली असून, ही गाडी सुमारे 5 तासांत पूर्ण चार्ज होते. रीजेनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीममुळे बॅटरीची कार्यक्षमता वाढते.
कंपनीकडून WEGO रेंजवर 5 वर्षांची वॉरंटी देण्यात येत आहे. यासोबतच रोडसाइड असिस्टन्सची सुविधा देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे प्रवासादरम्यान अडचण आल्यास त्वरित मदत मिळते. देशभरात 1500 पेक्षा जास्त सर्विस सेंटर्सच्या नेटवर्कमुळे ग्राहकांना सेवा सहज उपलब्ध होते, ज्यामुळे या वाहनांवर विश्वास अधिक वाढतो.






