
फोटो सौजन्य: Social Media
भारतात मर्सिडीज-Benz च्या कार्सची एक अनोखी क्रेझ आहे. या कार्स हाय लाइफस्टाइलचे प्रतीक मानली जाते. मर्सिडीजच्या लक्झरी, तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट डिझाईनमुळे अनेक भारतीयांना ती आकर्षित करते. विशेषत: तरुण पिढीमध्ये या ब्रँडची लोकप्रियता वाढली आहे. विवाह, पार्टी किंवा खास प्रसंगांमध्ये मर्सिडीज वापरणे म्हणजे स्टेटस सिम्बॉल जपले असे मानले जाते. याशिवाय, मर्सिडीजच्या विविध मॉडेल्समध्ये आधुनिक फिचर्स आणि आरामदायी अनुभव मिळतो, ज्यामुळे ग्राहकांची मागणी वाढली आहे. त्यामुळेच कंपनी सुद्धा नवीन कार्स भारतात लाँच करत आहे. नुकतेच कंपनीने Mercedes E Class LWB नावाची कर लाँच केली आहे.
सहाव्या पिढीतील मर्सिडीज ई-क्लास तीन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. त्यांची नावे e200, e220d आणि e450 4MATIC आहेत.
E-Class 200 ची एक्स-शोरूम किंमत 78.5 लाख रुपये आहे.
E-Class 220d ची एक्स-शोरूम किंमत 81.5 लाख रुपये आहे.
E-Class 450 4MATIC ची एक्स-शोरूम किंमत 92.5 लाख रुपये आहे.
हे देखील वाचा: टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली Mahindra XUV 700 EV, मिळू शकते 500 KM ची रेंज
नवीन ई-क्लासच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात वेगवेगळ्या स्क्रीनसह एक मोठा सुपर स्क्रीन सेटअप आहे. यात 12.3-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 14.4-इंचाचा मुख्य इन्फोटेनमेंट आणि 12.3-इंचाचा सेकेंडरी स्क्रीन आहे.
याशिवाय, 64 रंगाचे कस्टमाइजेबल एम्बिएंट लाइटिंग, चार-झोन हवामान नियंत्रण, वायरलेस चार्जर, एकाधिक टाइप-सी चार्जिंग पोर्ट, ऑटो-डिमिंग IRVM, डॅशबोर्ड-माउंट केबिन-फेसिंग कॅमेरा, मागील एसी व्हेंट्स, बर्मेस्टर-सोर्स्ड 17 आहेत.
नवीन ई-क्लासमध्ये 13 मिमी उंच, मागील मॉडेलपेक्षा 14 मिमी लांब आणि 15 मिमी लांब व्हीलबेस आहे. त्याच्या साइड प्रोफाइलमध्ये स्लीक, एस-क्लास इंस्पायर्ड फ्लश डोअर हँडल आणि 18-इंच अलॉय व्हील आहेत. यात ट्राय-एरो पॅटर्नसह नवीन एलईडी टेल लॅम्प देखील आहेत. इतकेच नाही तर त्याच्या टॉप-स्पेक e450 व्हर्जनला वेगवेगळ्या पॅटर्नच्या अलॉय व्हीलसह AMG-लाइन ट्रीटमेंट देखील मिळते.
या नवीन मर्सिडीज कारही किंमत तब्बल 78.5 लाख रुपये ठेवण्यात आली आहे, जी नक्कीच सर्वसामान्यांची झोप उडवणारी आहे.