फोटो सौजन्य: Social Media
सध्या भारतीय कार मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपनीज आपल्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करत आहे. काही बजेट कार्स लाँच करत आहेत तर काही प्रीमियम इलेक्ट्रिक कार लाँच कण्याच्या तयारीत दिसत आहे. भविष्यातील ऑटो क्षेत्राकडे बघता पुढे नक्कीच इलेक्ट्रिक कार्सचा दबदबा वाढणार आहे. यामुळेच ऑटो कंपनीज इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करत आहे.
भारतीय बाजारपेठेत ICE वाहनांची तसेच EV विभागातील वाहनांची मागणी लक्षात घेऊन वाहन उत्पादक कंपनीज सतत नवीन कार्स बाजारात आणण्याची तयारी करत असतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिंद्रा लवकरच XUV 700 EV लाँच करू शकते. यापूर्वी ही कार टेस्टिंग दरम्यान दिसून आली आहे. टेस्टिंग युनिटकडून कोणत्या प्रकारची माहिती प्राप्त झाली आहे, त्याबद्दल आपण जाणून घेऊया.
हे देखील वाचा: Electric Cars बनवणाऱ्या ‘या’ कंपनीजवर ग्राहक करतात डोळे झाकून विश्वास
रिपोर्ट्सनुसार, महिंद्रा आपली नवीन इलेक्ट्रिक SUV Mahindra XUV 700 EV ची टेस्टिंग करत आहे. अशी अपेक्षा आहे की कंपनी लवकरच ही इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत लाँच करू शकते.
टेस्टिंग दरम्यान दिसलेल्या महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या काही फीचर्सविषयी माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, यामध्ये एक नवीन फ्रंट दिला जाऊ शकतो ज्यामध्ये क्लोज्ड ग्रिल दिले जातील. यासोबतच नावीन्य देण्यासाठी नवीन डिझाइन केलेले लाइट्स दिले जाऊ शकतात. EV चे साइड प्रोफाईल ICE व्हर्जनसारखेच असेल. पण त्याची रचना सध्याच्या एसयूव्हीपेक्षा खूपच चांगली असेल. आतील भागात तीन स्क्रीन दिल्या जाऊ शकतात जे संपूर्ण डॅशबोर्डवर फिट केले असतील.
हे देखील वाचा: आता AI च्या मदतीने चालणार ‘ही’ इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या केव्हा होणार लाँच
माहितीनुसार, महिंद्राकडून या एसयूव्हीमध्ये 80 kWh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते. यामुळे ही एसयूव्ही एका चार्जमध्ये 500 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळवू शकते. रिपोर्ट्सनुसार, यात ड्युअल मोटर AWD सिस्टम दिली जाऊ शकते. वेगवान चार्जरसह, ही कार 30 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज केली जाऊ शकते.
सध्या या कारची महिंद्राकडून टेस्टिंग सुरू आहे. SUV लाँच करण्याबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या Bharat Mobility मध्ये ही लाँच केली जाण्याची अपेक्षा आहे.






