फोटो सौजन्य: Social Media
देशात सणासुदीचा काळ चालू झाला आहे. आणि याचसोबत अनेक ऑटो कंपनीज भारतीय ग्राहकांसाठी उत्तोमोत्तम कार्स मार्केटमध्ये आणताना दिसत आहे. नुकतेच निसान इंडियाने एक बजेट फ्रेंडली कार मार्केटमध्ये आणली आहे.
निसान इंडियाने आपली नवीन सब-4-मीटर कॉम्पॅक्ट SUV Nissan Magnite Facelift भारतात लाँच केली आहे. त्याची किंमत आधीच्या मॉडेलप्रमाणेच ठेवण्यात आली आहे. कंपनीने यामध्ये 40 हून अधिक सेफ्टी फीचर्स समाविष्ट केले आहेत. चला या कारच्या अन्य फीचर्सबद्दल जाणून घेऊया.
नवीन मॅग्नाइट फेसलिफ्टच्या डिझाईनमध्ये बदल दिसून आले आहेत. यात नवीन डिझाइनचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. त्याच वेळी, मागील बाजूस असलेल्या टेल लॅम्पमध्ये कोणतेही बदल केले गेले नाहीत, परंतु कारला नवीन रूप देण्यासाठी त्याचे एलिमेंट्स बदलण्यात आले आहेत.
या कारच्या केबिन आणि लेआउटमध्ये कोणतेही बदल केले नाहीत, परंतु निसानने त्याच्या टच सरफेस आणि अपहोल्स्ट्रीसाठी नवीन स्टीयरिंग व्हील आणि कलर स्कीम दिली आहे. यासोबतच 360-डिग्री कॅमेरा, वायरलेस फोन मिररिंग, ड्रायव्हरच्या सीटसाठी उंच ॲडजस्टमेंट, पॉवर्ड मिरर, HEPA एअर फिल्टर, एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी डीआरएल यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. यामध्ये नवीन आय-की देण्यात आली आहे. ज्यामुळे तुम्ही 60 मीटर अंतरावरून या कारचे इंजिन सुरू करू शकता.
यासोबतच बाय-फंक्शनल प्रोजेक्टरसह ऑटो एलईडी दिवा, ऑटो डिम फ्रेमलेस IVRM, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, फ्रंट आर्मरेस्ट, 336-540 लीटर बूट स्पेस, 19+ युटिलिटी स्टोरेज यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.
हे देखील वाचा: Car Knowledge:कारमध्ये AC चा वापर किती वेळ करावा? आताच लक्षात घ्या, होईल तुमचाच फायदा
निसान मॅग्नाइट फेसलिफ्ट प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनेक उत्तमोत्तम फीचर्सनी सुसज्ज आहे. यामध्ये व्हीडीसी, ईएससी, टीपीएमएस, ईबीएससह एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम, हिल स्टार्ट असिस्ट, हायड्रोलिक ब्रेक असिस्ट, प्रबलित बॉडी स्ट्रक्चर, डोअर प्रेशर सेन्सर आणि ग्रॅव्हिटेशनल सेन्सर, व यांसारखे अन्य फीचर्स समाविष्ट आहे.
Nissan Magnite फेसलिफ्ट 6 व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहे, ज्यांची नावे Visia, Visia+, Acenta, N-Connecta, Tekna आणि Tekna+ अशी आहेत. त्याची एक्स-शोरूम किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरू होते. ही किंमत व्हेरियंटनुसार बदलू शकते.