फोटो सौजन्य- iStock
कारमधील सर्वात आवश्यक घटकांपैकी एक घटक हा AC आहे. आजच्या काळात ऋतु कोणताही असो कारमध्ये एसीचा वापर केला जातो. उन्हाळ्यात आणि ऑक्टोबर हिटच्या काळात तर एसीचा वापर अजून वाढलेला दिसतो. एसी चालविण्याची एक मर्यादाही असते ती जाणून घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकते. कारमध्ये नेमका किती वेळ एसी चालविणे योग्य आहे माहित असायला हवे. ज्यामुळे आरोग्य आणि कार दोन्हीवर परिणाम होणार नाही. जाणून घेऊया याबद्दल
कारच्या एसी (AC)वापरासंबंधी माहिती
एसी प्रत्येक वेळी चालवू नये- कारमधील एसी हा आवश्यकतेनुसारच चालू करा. ज्यावेळी बाहेरील तापमान हे जास्त नसेल तर त्यावेळी कारच्या खिडक्या उघड्या ठेवा. यामुळे इंधनाची बचत होते आणि तुम्हालाही मोकळा श्वास मिळतो.
एसीचा मॉडरेशन मध्ये उपयोग करा- जर तुम्हाला एसी चालवायची असल्यास तर मध्यम अथवा कमी स्पीडवर चालवा. हाय स्पीडवर एसी चालविल्याने इंजिनवर जास्त दबाव पडतो. ज्यामुळे कारचे मायलेजही कमी होऊ शकते.
कार सुरु केल्यानंतर लगेच एसी सुरु करु नये- कार सुरु केल्यानंतर एसी सुरु करण्याची अनेकांना सवय असते मात्र काही मिनिंटांकरिता कारला एसी शिवाय चालवावे त्यानंतर एसी सुरु करावा. यामुळे कारच्या इंजिनवरील दबाव कमी होतो.
एसीचे योग्य टेंपरेचर (Temperature) – एसी सुरु करताना एकदम कमी टेंपरेचर सेट करु नये सामान्यत: 22 ते 24 C वर एसी चालविल्याने आरामदायक वातावरण बनते. त्यामुळे इंधनाचीही बचत होते.
कारचे सावलीमध्ये पार्किंग करावे- जर तुम्ही कार उन्हात पार्क करत आहात तर तुमच्या कारच्या बाहेरील बाजू सहितच कारची आतील बाजूही गरम होते. त्यामुळे एसीला वातावरणाची योग्य पातळी गाठण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे इंधनावर ही जास्त वापरले जाते.
एसी योग्य पद्धतीने वापरल्यामुळे एसीमध्ये बिघाड होण्याची शक्यता ही कमी होते. तसेच इंधनाचा एसीसाठी होणार वापरही कमी होतो आणि तुमचा प्रवासही आरामदायी होतो.