Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ola Electric Boss Sale: Ola कडून बॉस सेलची घोषणा, फक्त 49999 रुपयात मिळणार S1 स्कुटर

देशातील आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी OLA नेहमीच उत्कृष्ट फीचर्ससह स्कूटर ऑफर करत असते. नुकतेच कंपनीने सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी एक विशेष सेलची घोषणा केली आहे. चला जाणून घेऊया, या ऑफरमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 03, 2024 | 08:38 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सध्या देशभरात नवरात्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. खरंतर गणेशोत्सव सुरु झाल्यानंतर सणासुदीचा काळ सुरु चालू झाला असतो. या सणासुदीच्या काळात अनेक ब्रॅण्ड्स आपल्या उत्पादनावर अधिकची सूट देत असतात. नुकतेच देशातील प्रमुख इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनीने म्हणजेच ओलाने एका मोठ्या सेलची घोषणा केली आहे.

सणासुदीचा काळ सुरू होताच कंपनीने बॉस नावाची ऑफर लाँच केली आहे. या ऑफरतून कोणता फायदा होऊ शकतो? कंपनी कोणत्या किंमतीत स्कूटर ऑफर करत आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या बातमीत जाणून घेणार आहोत.

बॉस सेलची झाली सुरुवात

Ola ने BoSS नावाची ऑफर लाँच केली आहे. ही सेल Biggest OLA Season Sale म्हणून सुरू करण्यात आली आहे. ज्यामध्ये कंपनी आपली स्कूटर अतिशय कमी किंमतीत देत आहे. यासोबतच इतरही अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत.

हे देखील वाचा: Volkswagen ने एकाच वेळी केल्या दोन कार्स लाँच, जाणून घ्या त्यांची किंमत आणि फीचर्स

या सेल अंतर्गत स्कुटर मिळणार या किंमतीत

कंपनीने OLA S1 फक्त 49999 रुपयांच्या किंमतीत ऑफर केला आहे. ही ऑफर OLA S1X च्या 2 kWh व्हेरियंटवर दिली जाईल. याशिवाय कंपनीने हे देखील स्पष्ट केले आहे की ही ऑफर मर्यादित स्टॉकवरच दिली जाणार आहे.

होणार बचतच बचत

49999 रुपयांची स्कूटर ऑफर करण्याव्यतिरिक्त, कंपनी बॉस सेल अंतर्गत S1 2kWh वर 25 हजार रुपये आणि S1 पोर्टफोलिओमधील इतर स्कूटरच्या खरेदीवर 15 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. एक्सचेंज बोनस म्हणून रु. 5,000, रु. 6,000 किमतीची 140 हून अधिक Move OS फीचर्स, रु. 7,000 ची आठ वर्षांची बॅटरी वॉरंटी, रु. 3,000 पर्यंतचे हायपर चार्जिंग क्रेडिट देखील दिले जात आहेत.

रेफरल प्रोग्राम

ओलाने रेफरल प्रोग्रामही सुरू केला आहे. ज्याअंतर्गत प्रत्येक रेफरलवर 3000 रुपयांची सूट दिली जाईल आणि रेफरीला दोन हजार रुपयांची सूटही मिळू शकेल. टॉप 100 रेफरर्सना 1111111 रुपयांपर्यंतची बक्षिसे दिली जातील. याशिवाय ॲक्सेसरीजवर कंपनीकडून अतिरिक्त ऑफर्सही दिल्या जात आहेत.

Ola S1x 2 kWh रेंज आणि फीचर्स

S1x ही ओलाची सर्वात कमी किंमतीची इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या स्कुटरच्या सर्वात स्वस्त व्हेरियंटमध्ये 2kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. पूर्ण चार्ज केल्यानंतर, ही स्कुटर इको मोडवर 84 किलोमीटर आणि सामान्य मोडवर 71 किलोमीटरपर्यंत चालवता येते.

या स्कुटरमध्ये 4.3-इंचाचा एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल, एलईडी लाइट्स, इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स ड्रायव्हिंग मोड, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, 34 लीटर अंडरसीट स्टोरेज, पुढील आणि मागील बाजूस ड्रम ब्रेकसह 12-इंच व्हील्स आहेत.

Web Title: Ola announced boss sale s1 scooter available at just rs 49999

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2024 | 08:38 PM

Topics:  

  • Bumper discounts

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.