फोटो सौजन्य; X
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी मिळत आहे. आज प्रत्येक वाहन उत्पादक कंपनी आपले स्वतःचे इलेक्ट्रिक उत्पादन मार्केटमध्ये लाँच करत आहे. आता फक्त इलेक्ट्रिक कार नाही तर ई-बाईक आणि स्कूटर सुद्धा मार्केटमध्ये लाँच होत आहे. त्यातही ओला इलेक्ट्रिकच्या स्कूटर आणि बाईक्सला मार्केटमध्ये चांगली मागणी मिळत आहे.
2024 मध्ये ओला इलेक्ट्रिकने ई-बाईक सेगमेंटमध्ये आपले पहिले पाऊल ठेवत रोडस्टर बाईक्स लाँच केल्या होत्या. आता कंपनी पुन्हा एकदा फेब्रुवारी 2025 मध्ये आपली नवीन ई-बाईक लाँच करणार आहे.
Nissan Magnite आता जागतिक स्तरावर होणार उपलब्ध, 10000 वाहनांच्या निर्यातीला सुरुवात
भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सतत वाढत आहे. हे लक्षात घेता, वाहन उत्पादक आता स्कूटर तसेच बाईक विभागात नवीन उत्पादने सादर आणि लाँच करत आहेत. ओला इलेक्ट्रिक लवकरच नवीन इलेक्ट्रिक बाईक्स लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनी कोणत्या प्रकारच्या बाईक कोणत्या प्रकारच्या फीचर्स आणि रेंजसह लाँच करू शकते, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
ओला इलेक्ट्रिक भारतीय बाजारात नवीन बाईक लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीकडून नवीन बाईक्स ५ फेब्रुवारी २०२५ रोजी लाँच केल्या जातील. कंपनीने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.
कंपनीने सोशल मीडियावर काही टीझर जारी केले आहेत, त्यानुसार OLA Roadster X अनधिकृतपणे लाँच केले जाईल. यासोबतच आणखी काही बाईक्स बाजारात आणल्या जाऊ शकतात.
Hyundai ची ‘ही’ एसयूव्ही महागली, जाणून घ्या कोणत्या व्हेरियंटला खरेदी करणे झाले महाग
याआधीही कंपनीचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी ओला रोडस्टर एक्स बाईकबाबत काही व्हिडिओ सोशल मीडियावर रीलज केले होते. ज्यामध्ये ते बाईक चालवताना दिसले होते. यानंतर आता आणखी एक टीझर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये बाईकच्या नावासह तारखेची माहिती दिली आहे.
कंपनीने लाँच केलेल्या नवीन बाईकमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात येतील. ओला रोडस्टर एक्स ही एक एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक बाईक असेल जी सीबीएस, डिस्क ब्रेक, स्पोर्ट्स, नॉर्मल, इको रायडिंग मोड्स, ओला मॅप टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, ओटीए अपडेट्स, डिजिटल की लॉक सारख्या फीचर्ससह येईल.
एंट्री-लेव्हल बाईक म्हणून लाँच केलेली, रोडस्टर एक्स मध्ये २.५, ३.५ आणि ४.५ किलोवॅट प्रति तास क्षमतेच्या बॅटरीने सुसज्ज आहे. यासह, रोडस्टर एक्सचा टॉप व्हेरियंट २०० किलोमीटरपर्यंत चालवता येतो.
15 ऑगस्ट २०२४ रोजी ओलाने एक कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यामध्ये अनेक बाईक दाखवण्यात आल्या. यावेळी कंपनीकडून या बाईकच्या किंमतीची माहितीही देण्यात आली. त्यानुसार ओला रोडस्टर एक्स ७५ हजार रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत आणली जाऊ शकते.