फोटो सौजन्य: Social Media
सध्या देशभरात इलेक्ट्रिक वाहनांचे वारे जोरदार वेगाने वाहताना दिसत आहे. अनेक कार आणि दुचाकी उत्पादक कंपनीज, जे आधी फक्त इंधनावर चालणारी वाहनं मार्केटमध्ये आणत होती, तेच आता इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर लक्षकेंद्रित करत आहे. यावरून हे समजते की आगामी काळ हा नक्कीच इलेक्ट्रिक वाहनांचा असणार आहे.
आता जरी अनेक कंपनीज इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर फोकस्ड असले तरीही काही कंपनीज अशा सुद्धा आहेत, ज्या पूर्वीपासून इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करीत आहे. यातीलच एक कंपनी म्हणजे ओला इलेक्ट्रिक. ही कंपनी आपल्या उत्तम आणि स्वस्त ई स्कूटरमुळे प्रसिद्ध आहे. नुकतेच कंपनीने दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये लाँच केले आहेत, ज्याची किंमत सर्वसामान्यांना परवडणारी आहे.
1 कोटी किंमतीची Volvo XC90 खरेदी करण्यासाठी किती करावे डाउन पेमेंट? किती असेल EMI?
Ola ने भारतात आपली पहिली B2B ओरिएंटेड इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. ही स्कूटर Gig आणि Gig+ या दोन व्हेरियंटमध्ये बाजारात आणली गेली आहे. या दोन्ही व्हेरियंटची किंमत 50 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या ईव्हीचे डिझाइन कमर्शियल टू-व्हीलर म्हणून करण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये एक लांब सीट आहे, ज्यावर एक व्यक्ती सहजपणे बसू शकते. यासोबतच तो एक मोठा कॅरिअर देखील सहजपणे घेऊन जाऊ शकतो.
ओला गिगमध्ये 250 व्हॅटची मोटर आहे, ज्याद्वारे स्कूटरला 25 किमी प्रतितास वेगाने चालवता येते. म्हणजेच ही स्कूटर चालवण्यासाठी रेजिस्ट्रेशनची गरज नाही. ओलाची ही ईव्ही Yulu मॉडेल्सला टक्कर देऊ शकते, ज्याचा वापर आजकाल मोठ्या शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी होत आहे.
Ola Gig+ ही अधिक दमदार इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या EV मध्ये 1.5 kW ची मोटर आहे, ज्याच्या मदतीने ही स्कूटर 45 kmph च्या वेगाने चालवता येते. ही स्कूटर रस्त्यावर चालवण्यापूर्वी तुम्हाला तिचे रजिस्ट्रेशन करावे लागेल.
ओलाच्या या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर एक सिंगल रिमूवेबल 1.5 kWh बॅटरी पॅकसह येतात. परंतु तुम्ही Gig+ घेतल्यास तुम्हाला दोन बॅटरी पॅकचा पर्याय देखील मिळू शकतो. Ola Gig ने एका बॅटरी पॅकसह 112 किलोमीटरची रेंज ऑफर करण्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे, Gig+ एकाच बॅटरी पॅकसह 81 किलोमीटरची रेंज देणार आहे. तुम्ही ही स्कूटर दोन बॅटरी पॅकसह घेतल्यास, या इलेक्ट्रिक स्कूटरच्या एका चार्जिंगमध्ये 157 किलोमीटरचे अंतर कापता येईल.
ओला गिगची सुरुवात ॲप-बेस्ड अॅक्सेससह सुरू केली जाऊ शकते. या स्कूटर्स लवकर चार्ज करता येतील असा कंपनीचा दावा आहे. मात्र चार्जिंग टाइमबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. Ola Gig ची सुरुवातीची किंमत 39,999 रुपये आहे, तर Gig+ ची सुरुवातीची किंमत 49,999 रुपये आहे. कंपनी एप्रिल 2025 पासून या ईव्हीचे डिलिव्हरी सुरू करू शकते. या स्कूटरची बुकिंग फक्त 500 रुपयांमध्ये करता येणार आहे.