फोटो सौजन्य- अधिकृत संकेतस्थळ
जगविख्यात कंपनी Royal Enfield ची बाईक स्वत:कडे असावी अशी प्रत्येक बाईक वापरकर्त्याचे स्वप्न असते. त्यामुळे अनेक बाईक वापरकर्ते ही ड्रीम बाईक विकत घेतात. या कंपनीच्या बाईकची डिझाईन हे ग्राहकांना आकर्षित करते. तसेच इंजिन क्षमताही कमालीची आहे त्यामुळे या बाईकची दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणात विक्री होत आहे. भारतातही या कंपनीच्या बाईकचा मोठा ग्राहकवर्ग आहे. मात्र याच रॉयल एनफील्ड बाईकमध्ये समस्या असल्याने कंपनीने बाईक रिकॉल केल्या आहेत.
या समस्येमुळे परत मागविण्यात आल्या बाईक्स
रॉयल एनफिल्ड बाईकमध्ये रिफ्लेक्टर्सच्या सुरक्षिततेची समस्या जाणवत असल्याने कंपनीने बाईक रिकॉल नोटीस जारी केली आहे. कंपनीच्या इतिहासात रिकॉलची नोटीस फार दुर्मिळ आहे. कंपनीने नोव्हेंबर 2022 ते मार्च 2023 तयार करण्यात आलेल्या बाईक्ससाठी ही रिकॉल नोटीस जारी केली आहे.
नेमकी समस्या
बाईकचे रिफ्लेक्टर हे रिफ्लेक्टिव दर्जा आणि कामगिरी आवश्यकतेनुसार पुर्ण करु शकत नाहीत. त्यामुळे त्यांची गुणवत्ता ही आवश्यकतेपेक्षा कमी आहे. रॉयल एनफिल्डने सांगितले की परीक्षण करताना कळाले की नोव्हेंबर 2022 ते मार्च 2023 मध्ये तयार केलेल्या बाईक्समध्ये असे रिफ्लेक्टर आहेत जे प्रकाशाला ( लाईटला) प्रभावी रुपात रिफ्लेट करु शकत नाही. मुख्यत: ज्यावेळी कमी उजेड असतो त्या स्थितीमध्ये प्रभावी प्रकाश रिफ्लेक्ट होत नाही. त्यामुळे बाईकची विजिबिलिटी म्हणजे दृश्यता प्रभावित होते ज्यामुळे बाईकस्वारास धोका निर्माण होऊ शकतो.
Reflector (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
सर्वच बाईक रिकॉलचा भाग
नेमक्या किती बाईक्सना या समस्येचा फटका बसला याची कोणतीही माहिती नाही, कारण कंपनीने याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.सध्या, रॉयल एनफील्डच्या पोर्टफोलिओमध्ये एकूण 11 बाईक्स ऑफर केल्या जात आहेत. आणि या सर्व बाईक या रिकॉलचा एक भाग असल्याचे दिसते. कंपनीने हे स्पष्ट केले आहे की, ही समस्या फारच कमी बाइक्समध्ये दिसली आहे.
बाईकमधील बदल 15 मिनिटांत पूर्ण होईल
ज्या ग्राहकांच्या बाइक या रिकॉलमुळे प्रभावित झाल्या आहेत त्यांना कंपनी सूचित करणार आहे. त्यांच्याशी कंपनीकडून टप्प्याटप्प्याने संपर्क साधला जाईल. बाधित बाईक मालक त्यांच्या बाईक्स जवळच्या कंपनीच्या सेवा केंद्रात दुरुस्तीसाठी घेऊन जाऊ शकतात. कंपनीकडून साइड आणि रिअर रिफ्लेक्टर मोफत बदलणार आहे.रॉयल एनफिल्डने दावा केला आहे की, हे सर्व केवळ 15 मिनिटांत पूर्ण होईल. भारत, युरोप, यूके, ब्राझील, लॅटिन अमेरिका, दक्षिण कोरिया, कॅनडा आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये रिकॉल जारी करण्यात आले आहे.