(फोटो सौजन्य-AI एआय)
इंडियन ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सध्या सुपरबाईक्सचा विषय निघाला की एकाच नावाची चर्चा रंगते – Kawasaki Ninja 500! ५.७६ लाख रुपये एक्स-शोरूम किंमतीत लाँच झालेली ही जपानी जादुगिरी किमया रस्त्यावर उतरण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. पण खरी मज्जा तेव्हा येते जेव्हा या बाईकची तुलना मार्केटमधील तिची कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या Aprilia RS 457 सोबत केली जाते. किंमत, पॉवर आणि फीचर्सच्या या वन टू वन महायुद्धात कोण कोणावर भारी पडणार, याचा हा थरारक आणि इंटरेस्टिंग आढावा…
अप्रिलिया आरएस ४५७ ची एक्स-शोरूम किंमत सुमारे ४.२२ लाख रुपयांपासून सुरू होते, जी कावासाकी निन्जा ५०० च्या तुलनेत बरीच economical ठरू शकते. परफॉर्मन्सचा विचार केला तर, अप्रिलियामध्ये ४५७ सीसीचे पॅरलल-ट्विन लिक्विड-कूल्ड इंजिन दिले आहे, जे सुमारे ४७.५ पीएस पॉवर आणि ४३.५ एनएम टॉर्क जनरेट करते. दुसरीकडे, कावासाकी निन्जा ५०० मध्ये ४५१ सीसीचे ट्विन-सिलेंडर इंजिन आहे, जे ४५.४ पीएस पॉवर आणि ४२.६ एनएम टॉर्क प्रदान करते. पॉवरच्या बाबतीत अप्रिलिया किंचित पुढे सरकते.
डिझाईन आणि वजनाच्या बाबतीत बोलायचे तर, अप्रिलिया आरएस ४५७ चे वजन १७५ किलो आहे आणि ती अल्युमिनियम पेरिमेटर फ्रेमवर आधारित आहे, जी ट्रॅक रायडिंगसाठी एकदम भारी मानली जाते.
तर कावासाकी निन्जा ५०० चे वजन १७१ किलो असून ती ट्रेलिस फ्रेमवर उभी आहे. निन्जा ५०० मधील रिलॅक्स रायडिंग पोझिशन लांबच्या प्रवासासाठी अतिशय सुखाची ठरते, पण फीचर्सच्या बाबतीत ती थोडी मागे पडते कारण त्यात राईड मोड्स किंवा क्विक-शिफटरसारख्या आधुनिक गोष्टींचा अभाव आहे.
थोडक्यात सांगायचे तर, जर बजेट आणि आक्रमक ट्रॅक परफॉर्मन्स हवा असेल, तर अप्रिलिया आरएस ४५७ तुमचे मन जिंकेल. पण कावासाकीचा ब्रँड व्हॅल्यू, तिचा जपानी भरवसा आणि निन्जा ब्रँडची क्रेझ वेगळीच आहे. त्यामुळे पोरं नक्कीच संभ्रमात पडणार की खिशातला खर्च बघून अप्रिलिया निवडायची की रुबाबात कावासाकीच्या स्वारीवर स्वार व्हायचे!






