फोटो सौजन्य: Social Media
भारतात अनेक उत्तम कार उत्पदक कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांना बेस्ट कार ऑफर करत असतात. यातीलच एक विश्वासाचे नाव म्हणजे स्कोडा. आजही रस्त्यांवर स्कोडाच्या कार धावताना दिसल्या की अनेकांच्या नजरा त्या कारवर रोखल्या जातात. स्कोडा नेहमीच आपल्या कारचे डिझाइन आणि लूकवर विशेष लक्ष देत असते. तसेच नवनवीन कार मार्केटमध्ये सादर करत असते. नुकतेच कंपनीने Skoda Kylaq ही दमदार कार मार्केटमध्ये लाँच केली होती.
स्कोडा Kylaq भारतात लाँच झाली आहे आणि त्याची बुकिंग देखील सुरू झाली आहे. या कारची डिलिव्हरी २७ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार आहे. यात १-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन वापरले आहे, जे कुशाक आणि स्लाव्हियामध्ये देखील आढळते.
फायदे ठाऊक असेलच, पण Second Hand Car खरेदी करण्याआधी त्याचे तोटे सुद्धा जाणून घ्या
स्कोडाने त्यांच्या नवीन कार Kylaq चा मायलेज मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक पॉवरट्रेन स्पेसिफिकेशन्ससह जाहीर केला आहे. ही कार लाँच झाल्यानंतर दहा दिवसातच याला १० हजारांहून अधिक बुकिंग झाली होती. ही कार एका लिटर पेट्रोलमध्ये किती मायलेज देते आणि त्यात कोणते खास फीचर्स आहेत त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
या कारमध्ये १.०-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे. हे इंजिन 115 पीएसची पॉवर आणि 178 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन ६-स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह सादर करण्यात आले आहे. स्कोडा कायलॅक मॅन्युअल इंजिन एका लिटर पेट्रोलमध्ये 19.68 किमी प्रति लिटर मायलेज देईल आणि टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक इंजिन 19.05 किमी प्रति लिटर मायलेज देईल. ही कार ब्रेझा, नेक्सॉन, व्हेन्यू आणि सोनेटपेक्षा एका लिटर पेट्रोलमध्ये जास्त मायलेज देण्यास सक्षम आहे.
स्कोडा कायलॅक चार व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. त्याचा बेस व्हेरियंट क्लासिक आहे, मिड व्हेरिएंट सिग्नेचर आणि सिग्नेचर+ आहेत आणि त्याचा टॉप व्हेरियंट प्रेस्टीज आहे. स्कोडा कायलॅकची सुरुवातीची किंमत 7.89 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि टॉप व्हेरियंटची किंमत 14.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.
जबरदस्त इंजिन आणि नव्या डिजाइनसह Royal Enfield Scram 440 लाँच, जाणून घ्या किंमत
या कारमध्ये शाइन करणारी काळी फ्रंट ग्रिल, १७ इंच अलॉय व्हील्स, एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, एलईडी टेल लाइट्स, ड्रायव्हर आणि को-ड्रायव्हरसाठी सहावी इलेक्ट्रिकली ॲंडजस्टेबल सीट्स, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, सिंगल पेन इलेक्ट्रिक सनरूफ, 20.32 सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस आहे. यात चार्जिंग, 25.6 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टम, ट्रंकमध्ये तीन किलो क्षमतेचा हुक यासारख्या फीचर्ससह सुसज्ज आहे.
अलीकडेच Bharat NCAP च्या सेफ्टी क्रॅश टेस्टमध्ये या कारला ५-स्टार रेटिंग मिळाले आहे. हे २५ हून अधिक ॲंक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेफ्टी फीचर्सने सुसज्ज आहे. यात सहा एअरबॅग्ज, ब्रेक डिस्क वाइपिंग, ईएससी, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, इलेक्ट्रॉनिक डिफरेंशियल लॉक, मल्टी कोलिजन ब्रेक यासारखे फीचर्स दिले गेले आहे.