फोटो सौजन्य: iStock
सध्या देशभरात अनेक बेस्ट कार लाँच होताना दिसत आहे. देशातील कार विक्रीत सुद्धा झपाट्याने वाढ होत आहे. पण आजही अनेक जण नवीन कार घेण्याऐवजी सेकंड हँड कार घेणं पसंत करत असतात. सेकंड हँड कार घेण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पैश्यांची बचत. त्यामुळेच सेकंड हँड कारच्या विक्रीत देखील वाढ होताना दिसत आहे.
सेकंड हँड कार घेण्याचे अजून एक कारण म्हणजे लोकांना त्यावर रोड टॅक्सही भरावा लागत नाही. त्याच वेळी, या कार बजेटमध्ये देखील बसते, ज्यामुळे बरेच लोक सेकंड हँड कार खरेदी करण्यास प्राधान्य देत असतात. परंतु, सेकंड हँड कार खरेदी करण्याचे काही तोटे असू शकतात, ज्याकडे दुर्लक्ष केल्याने भविष्यात तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते. सेकंड हँड कार खरेदी करण्याच्या तोट्यांबद्दल जाणून घेऊया.
कार्तिक आर्यन मारुती सुझुकी ब्रेझ्झाचा नवा चेहरा; दिल्लीत रंगला कार्यक्रम
सेकंड हँड कारची नेमकी स्थिती काय आहे हे ठरवणे कठीण असते. कधीकधी इंजिन, ट्रान्समिशन, ब्रेक आणि वाहनाच्या इतर मुख्य भागांमध्ये दोष आढळू शकतात, जे तुम्हाला कार खरेदी करताना दिसणार नाहीत. बऱ्याचदा या त्रुटी कारमध्ये नंतर आढळतात आणि त्या दुरुस्त करणे तुमच्यासाठी खूप महागडे ठरू शकते.
नवीन कार खरेदी करताना, कंपन्या तुम्हाला त्याच्या वॉरंटीपासून ते नियमित सेवेपर्यंत सर्व गोष्टींची माहिती देतात. तेच सेकंड-हँड कारमध्ये अशी माहिती पूर्णपणे उपलब्ध नसते. यामुळे तुम्हाला जुन्या कार मालकाने कारची योग्य काळजी घेतली आहे की नाही हे नीट कळत नाही. जर वाहनाची योग्य देखभाल केली गेली नाही तर ते लवकरच बिघडू शकते.
असे अनेक वेळा दिसून आले आहे की लोक त्यांच्या कारचे किलोमीटर रीडिंगमध्ये फेरबदल करतात आणि नंतर ते दुसऱ्याला विकतात. ज्यामुळे खरेदीदाराचा असा गैरसमज असू शकतो की कार कमी चालवली गेली आहे, पण प्रत्यक्षात ती जास्त चालवली गेली असते.
ऑटो एक्स्पो 2025 मध्ये Eicher Pro X Range लाँच, जाणून घ्या फीचर्स
सेकंड हँड कारचा पूर्वीचा मालक आपल्याला सांगत नाही की या कारचे किती वेळा अपघात झाले आहे किंवा यात काही गंभीर समस्या आहे का. जर असेच काही राहिले तर कार खरेदी करणाऱ्या व्यक्तीला नंतर खूप त्रास होऊ शकतो. खरंतर अपघातानंतर कारमध्ये अनेक प्रकारचे दोष निर्माण होतात, जे नंतर मोठ्या खर्चाचे कारण बनू शकतात.
जर सेकंड हँड कारमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष असेल तर त्याची रिसेल व्हॅल्यू देखील कमी होते. याशिवाय, सेकंड-हँड कारमधील सेफ्टी फीचर्स आणि तंत्रज्ञान नवीन कारच्या तुलनेत जुने आणि कमी असू शकते. यामुळे तुम्हाला त्यात कमी सुरक्षितता मिळू शकते.