सोशल मीडियावर लोकप्रिय असणारे अनिरुद्धाचार्य महाराज आहे 'या' महागड्या कारचे मालक
सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे जे एका दिवसात कोणत्याही व्यक्तीस लोकप्रिय बनवू शकते. या सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही ट्रेंडिंग चालू असते. त्यातही इंस्टाग्राम सध्या रिल्सद्वारे अनेक जणं आज फेमस होत आहे. यात काही महाराज लोकांचा सुद्धा समावेश आहे. नुकतेच काही महिन्यांपूर्वी बागेश्वर बाबा सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंड होत होते. परंतु गेल्या काही दिवसांसपासून आपल्या अतरंगी उत्तरांमुळे अनिरुद्धाचार्य महाराजांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
साड्या सोशल मीडियावर दररोज त्यांचे व्हिडिओज व्हायरल होता असतात ज्यात ते त्यांच्या भक्तांच्या प्रश्नाचे उत्तरे देत असतात. अनिरुद्धाचार्य महाराज हे त्यांच्या कथांच्या प्रश्नोत्तरांच्या सत्रांसाठी ओळखले जातात, ज्यांचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर नक्कीच पहिले असतील. सध्या त्यांचा अजून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात ते आपल्या आलिशान कारमध्ये फिरत आहे. पण हे महाराज कोणती कार वापरत आहे हे तुम्हाला माहीत आहे का? चला याबद्दल जाणून घेऊया.
अनिरुद्धाचार्य महाराजांनी गेल्या महिन्यात एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये महाराज एका आलिशान कारमध्ये बसलेले दिसत होते. व्हिडिओमध्ये महाराज पांढऱ्या रंगाची आलिशान कार चालवत होते. या कारचे नाव Volvo Xc90 आहे, जी क्रिस्टल व्हाइट मेटॅलिक रंगत आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत तब्बल 1.1 कोटी रुपये आहे.
Volvo XC90 ही एक मोठी लक्झरी SUV आहे. यामध्ये तुम्हाला एअर सस्पेंशन, स्टँडर्ड 8-स्पीड ऑटोमॅटिक आणि AWD सारखे फीचर्स मिळतात. मोठ्या XC90 ला 48V सौम्य हायब्रिड बॅटरी सेट-अपसह 2.0l चार-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन मिळते.
हे देखील वाचा: वेळेच्या आतच Car Loan बंद करत आहात? मग ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा
या कारचे एकूणच पॉवर आउटपुट 300hp आणि 420Nm आहे. डिझेल व्हेरियंटच्या तुलनेत पेट्रोल व्हर्जनमध्ये जास्त पॉवरफुल आहे. वोल्वोची कार आरामदायी आणि लक्झरीच्या बाबतीत अधिक चांगली आहे. शहरी भागात मोठ्या प्रमाणावर ही कार चालताना दिसते.
या आलिशान कारमध्ये तुम्हाला एक सनरूफ, बॉवर्स आणि विल्किन्स (1400 डब्ल्यू, 19 स्पीकर) ऑडिओ सिस्टीम, 360-डिग्री कॅमेरा, पार्किंग असिस्ट पायलट, गरम समोरच्या सीट मिळतात.