फोटो सौजन्य: Freepik
हल्ली अनके नवनवीन कार्स मार्केटमध्ये लाँच होत आहे. या कारचे स्टायलिश डिझाईन आणि दमदार फीचर्स अनेक कारप्रेमींना आकर्षित करत आहे. आपल्याकडे नेहमीच स्वतःची कार विकत घेणं हे एक स्वप्न राहिलं आहे. बहुतेक जणं नोकरीला लागल्यावर आपले हे स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागतात. काही जाणं महिन्याला बचत आणि गुंतवणूक करून आपली ड्रीम कार विकत घेतात. तर कित्येक जणं बँकेकडून मिळणाऱ्या लोनच्या माध्यमातून हे स्वप्न पूर्ण करतात.
कार लोन घेतल्यावर आपल्या दर महिन्याला एक ठरविक रक्कम बँकेला द्यावी लागते ज्याला आपण ईएमआय असे देखील म्हणतो.अनेक वेळा कार लोन घेतल्यानंतर अनेक जणं ते काही वर्षानंतर पूर्णपणे बंद करण्याचा विचार करतात.
जर तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल आणि तुम्ही तुमचे कार लोन लवकर फेडण्याचा विचार करत असाल तर हे बातमी तुमच्यासाठीच आहे. चला जाणून घेऊया, कार लोन वेळेपूर्वी बंद करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
कार लोन बंद करण्यापूर्वी, तुम्हाला कर्जाच्या फोरक्लोजरसाठी बँक किंवा फायनान्स कंपनीकडे अर्ज करावा लागेल. यासोबतच तुम्हाला तुमचा कर्ज खाते क्रमांक, पॅन आणि पत्त्याची प्रत देखील या अर्जासोबत लावावी लागेल.
तुम्ही कार लोन बंद करण्यासाठी अर्ज केल्यानंतर, बँक उर्वरित कर्जाची रक्कम मोजेल. यामध्ये आत्तापर्यंत भरलेला व्याज आणि रक्कम तसेच फोरक्लोजरच्या तारखेचा सुद्धा विचार केला जाईल.
फ्लोटिंग रेट लोन वेळेवर बंद करण्यासाठी कुठलेही प्री-पेमेंट दंड नाही. तुम्ही जर फिक्स रेट कर्ज घेतले असेल तर काही शुल्क लागू होऊ शकतात. हे शुल्क फोरक्लोजर पेमेंट (Loan Foreclosure Charge) मध्ये समाविष्ट केले जात नाही.
थकबाकीची रक्कम मिळाल्यानंतर बँकेकडून मुदतवाढीची औपचारिकता पूर्ण केली जाते. यानंतर तुमचा ईएमआय बंद होतो. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, मूळ कागदपत्रे जसे की प्रॉपर्टी टायटल डीड आणि संबंधित कागदपत्रे 10 ते 15 दिवसांत तुम्हाला परत दिले जातात. ते परत करण्यास बँकेकडून विलंब झाल्यास संबंधित अधिकाऱ्याशी बोलणे आवश्यक आहे.
कार लोन वेळेआधीच बंद केल्यानंतर, तुम्ही बँकेकडून नो-ड्यूज प्रमाणपत्र (कार लोन एनओसी) घेणे आवश्यक आहे. या प्रमाणपत्रामध्ये तुमच्याकडे कोणतीही थकबाकी नसल्याचे नमूद करणे आवश्यक आहे. या प्रमाणपत्रामध्ये मालमत्तेचा पत्ता आणि ग्राहकाचे नाव असणे सुद्धा आवश्यक आहे.