Suzuki Lounge’Thane
Yamaha R2 भारतात २.३० लाखात लाँच; २६.५ पीएस पॉवर आणि क्विकशिफटरसह अनेक दमदार फीचर्स!
या उद्घाटनाबद्दल मत व्यक्त करत सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सेल्स अँड आफ्टर-सेल्सचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्री. हरी कृष्ण के. म्हणाले, “सुझुकी लाउंज आमच्या ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनातील महत्त्वाचे पाऊल आहे आणि सर्व्हिस अनुभवामध्ये ‘बाय युअर साईड’ (तुमच्या सोबत) ची भावना घेऊन येते. आजच्या ग्राहकांना केवळ सेवेपेक्षा अधिक अपेक्षा आहे. त्यांना पारदर्शकता, आराम आणि प्रीमियम अनुभवाची गरज आहे. सुझुकी लाउंजच्या माध्यमातून आम्ही उत्तम वातावरण निर्माण करत आहोत, जिथे ग्राहक विश्रांती घेऊ शकतात, कनेक्टेड राहू शकतात आणि त्यांच्या वाहनांच्या सर्व्हिसिंगमध्ये घेतली जाणारी काळजी आणि तज्ज्ञता आत्मविश्वासाने पाहू शकतात.”
सुझुकी लाउंज एका विचारपूर्वक डिझाइन केलेल्या वातावरणात आधुनिक सर्व्हिस वर्कशॉप, प्रीमियम ग्राहक लाउंज आणि नवीन वाहनांचे समर्पित प्रदर्शन क्षेत्र एकत्र आणते, ज्यामुळे ग्राहकांना पारंपरिक वर्कशॉप भेटीपेक्षा वेगळा आणि उत्तम अनुभव मिळतो.
ग्राहक लाउंजमध्ये आदरातिथ्य-केंद्रित दृष्टिकोन दिसून येतो, ज्यामध्ये आधुनिक अंतर्गत रचना (इंटेरियर्स), आकर्षक लाकडी डिझाइन अनुभव आणि लक्षवेधक, योग्य रीतीने संतुलित केलेली प्रकाशयोजना यांचा समावेश आहे. सर्व्हिस भेटीदरम्यान ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी कॅफे-शैलीतील रिसेप्शन, आरामदायक बसण्याची व्यवस्था आणि संभाषणासाठी खास जागा तयार करण्यात आल्या आहेत. सर्व्हिस क्षेत्र खुली जागा (ओपन लेआऊट) आणि ग्लास पार्टिशन्समुळे लाउंजशी थेट जोडलेले दिसते. सुझुकीचे प्रशिक्षित तंत्रज्ञ वाहनांची दुरुस्ती करत असताना ग्राहकांना वर्कशॉपमधील सर्व हालचाली लाउंजमध्ये बसून स्पष्टपणे पाहता येतात. ठाण्यातील हे आऊटलेट चार सर्व्हिस बे सह सज्ज आहे.
सर्व्हिस आणि लाउंज क्षेत्राला जोडून समर्पित नवीन वाहन प्रदर्शन क्षेत्र तयार करण्यात आले आहे. येथे ग्राहक त्यांच्या भेटीदरम्यान सुझुकीच्या अद्ययावत मोटरसायकल आणि स्कूटर्स पाहू शकतात, तसेच त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात. सर्व्हिस प्रक्रियेतील पारदर्शकता, नवीन उत्पादने जाणून घेण्याची संधी आणि आदरातिथ्य-प्रेरित जागा यांचा मेळ घालून सुझुकी लाउंज ग्राहकांना अधिक विश्वासार्ह आणि आनंददायी अनुभव प्रदान करते. सुझुकी लाउंजच्या उद्घाटनासह एसएमआयपीएल सर्व्हिस प्रवासाला अधिक समकालीन स्वरूप देत आपले विक्री-पश्चात्त नेटवर्क आणि ग्राहक टचपॉइंट्स अधिक दृढ करत आहे






