ठाणे बेलापूर रोडवरून जाताना दिवा सर्कल रोड हा दुचाकी चालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. 30 सप्टेंबर रोजी दुचाकी स्वार मुलुंडच्या दिशेने जात असताना, ऐरोली सिंगल जवळ असता त्याचा अपघातात मृत्यू झाला.
गणेशोत्सवात पाण्याची टंचाई निर्माण झाली होती, आता नवरात्रोत्सवातही पाणी टंचाई आहे. आता आम्ही तुम्हाला दरऱ्यापर्यंत मुदत देत आहोत. जर, नवरात्रीच्या आत जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर...
ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून मुंबई मेट्रो ४-अ चा भाग असलेल्या ठाणे मेट्रोमध्ये शहरात १० स्थानके आहेत. शहराच्या विविध भागांमधून या स्थानकांवर सहज पोहोचता येते.
शिवसेना शिंदे गटाच्या भिवंडी लोकसभा विभागाची युवा सेनेची कार्यकारीणी जाहीर झाली आहे. ही कार्यकारिणी जाहिर झाल्यावर युवा सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे.
गणेशोत्सवात मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे ५ लाख ९६ हजारांहून अधिक कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवास केला. यातून एसटी महामंडळाला सुमारे २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न मिळाले.
Sanjay Raut on Eknath shinde : बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीने आनंद दिघे यांचा फोटो लावण्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. यानंतर आता ठाण्यात संजय राऊतांविरोधात…
आंबिवली गावातील एका शेतकऱ्याचे घर आगीत भस्मसात झाले.घराला आग लागले त्यावेळी घरात कोणीही व्यक्ती नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र घराचे १०० टक्के नुकसान या आगीमध्ये झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहराच्या घोडबंदर भागात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना सहन करावा लागत आहे. घोडबंदर रोड सर्विस रोड विलीनीकरण काम तत्काळ थांबवा, अशी मागणी होत आहे...
पुन्हा एकदा नागलाबंदर भागात नागरिकांनी एकत्र जमून आंदोलन केले. आंदोलकांनी काहीवेळासाठी रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. जो पर्यंत न्याय मिळत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरु राहील अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
खड्डे, दररोजची होणारी वाहतूक कोंडी आणि अवजड वाहनांमुळे रस्त्याची झालेली बिकट अवस्था अशा अनेक कारणांमुळे ठाणेकर अक्षरश हैराण झाला आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी घोडबंदरवासीय अखेर आज रस्त्यावर उतरले.
ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक हि तत्त्व डावलण्यात आले असून एका राजकीय पक्षाच्या सोयीसाठी प्रभाग रचना करून नगरसेवक संख्या चोरी करण्यात आली आहे.
नुकतेच महाराष्ट्रातील १२ किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याने सर्वत्र आनंद व अभिमान व्यक्त केला जात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांनीही वेगवेगळ्या देखाव्यांद्वारे आपली कला सादर केली आहे
अधिकृत समितीचं नाव “नौपाडा आणि कोपरी प्रभाग समिती” असतानाही त्या पत्रकातून ‘कोपरी’ हा शब्द पुसून टाकण्यात आला. हा प्रकार उघड होताच कोपरीकरांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कामगार कर्मचारी संघर्ष कृती समितीच्या वतीने 6 वा आणि 7 वा वेतन आयोगाचा फरक मिळाला पाहिजे, वारस हक्क तात्काळ सुरू करा.