Tata Motors देशातील EV Ecosystem नव्या उंचीवर आणणार!
भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक Tata Motors ने देशातील शून्य-उत्सर्जन गतिशीलतेला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कंपनीने जाहीर केले की आता 25000 हून अधिक पब्लिक चार्जिंग स्टेशन इलेक्ट्रिक स्मॉल कमर्शियल व्हेईकल्स (ई-एससीव्ही) च्या ग्राहकांसाठी उपलब्ध झाले आहेत. ही चार्जिंग स्टेशन्स दिल्ली-एनसीआर, बेंगळुरू, मुंबई, चेन्नई आणि हैदराबादसह 150 हून अधिक शहरांमध्ये स्थापित करण्यात आली असून, प्रमुख लॉजिस्टिक्स हब्सपर्यंत पसरलेली आहेत. यामुळे लास्ट-माइल डिलिव्हरी ऑपरेटर्सना सुधारित रेंज, हाय परफॉर्मन्स आणि अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे.
ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा अधिक विस्तारण्यासाठी टाटा मोटर्सने 13 आघाडीच्या चार्जिंग पॉइंट ऑपरेटर्ससोबत सामंजस्य करारांवर (MoU) स्वाक्षरी केली आहे. या अंतर्गत पुढील 12 महिन्यांत आणखी 25000 पब्लिक चार्जर्स स्थापित केले जाणार आहेत. विद्यमान आणि आगामी सर्व चार्जर टाटा मोटर्सच्या अत्याधुनिक कनेक्टेड व्हेईकल प्लॅटफॉर्म फ्लीट एज वर एकत्रित करण्यात आले आहेत. यामुळे ग्राहकांना रिअल-टाइम नेव्हिगेशन सोपे होणार असून, त्यांच्या ऑपरेशन्सला अधिक गती मिळेल.
या भागीदारीत ए प्लस चार्ज, ॲम्पव्होल्ट्स, चार्जएमओडी, चार्ज झोन, इलेक्ट्रिक फ्युएल, एनव्हो द सस्टेनर, ईव्ही स्पॉट चार्ज, काझम, निकोल ईव्ही, सोनिक मोबिलिटी, थंडरप्लस सोल्युशन्स, वोल्टिक आणि झिऑन इलेक्ट्रिक या कंपन्यांचा समावेश आहे.
या उपक्रमाबाबत बोलताना टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल्सच्या एससीव्हीपीयूचे उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख पिनाकी हल्डर म्हणाले, “25000 पब्लिक चार्जिंग स्टेशनचा टप्पा पार करणे म्हणजे भारतातील इलेक्ट्रिक कार्गो गतिशीलतेला गती देण्याच्या आमच्या कटिबद्धतेतील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आधीच 10000 हून अधिक ऐस ईव्ही तैनात करून त्यांनी मिळून 6 कोटी किमीहून अधिक अंतर पार केले आहे. त्यामुळे ग्राहक आणि ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्समध्ये चार-चाकी इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांविषयी वाढता आत्मविश्वास दिसून येतो. नुकतेच लाँच केलेले ऐस प्रो ईव्ही प्रगत क्षमतांसाठी पसंत केले जात असून, शहरी व अर्ध-शहरी कार्गो गरजांची पूर्तता करण्यास सक्षम आहे.”
TVS iQube आणि Noise ने तुमच्या रायडींगला बनवले स्मार्ट! आता मिळणार टायर प्रेशर आणि बॅटरीचा अलर्ट
सध्या टाटा मोटर्सच्या ई-एससीव्ही लाइनअपमध्ये ऐस प्रो ईव्ही, ऐस ईव्ही आणि ऐस ईव्ही 1000 यांचा समावेश आहे. हे सर्व मॉडेल्स विविध शहरी व अर्ध-शहरी भागातील कार्गो गरजांसाठी डिझाइन करण्यात आले आहेत. तसेच ग्राहकांना अखंड सेवा मिळावी यासाठी टाटा मोटर्सने देशभरात 200 हून अधिक समर्पित ईव्ही सपोर्ट सेंटर्स उभारले आहेत.