Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र सरकारचा पुढाकार: दुष्काळग्रस्त भागांत 1500 अतिरिक्त जलसाठ्यांचे होणार संवर्धन

महाराष्ट्र सरकार आणि टाटा मोटर्समध्ये एका सामंजस्य करार झाला आहे. ज्याअंतर्गत टाटा मोटर्स महाराष्‍ट्रातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट-केंद्रित जलसंधारण उपक्रमाला अधिक बळ देणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 14, 2026 | 06:48 PM
टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र सरकारचा पुढाकार:

टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र सरकारचा पुढाकार:

Follow Us
Close
Follow Us:
  • टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र सरकारचा एकत्रित पुढाकार
  • कॉर्पोरेट-केंद्रित जलसंधारण उपक्रमाला अधिक बळ देणार
  • दुष्‍काळग्रस्‍त भागांमध्‍ये १,५०० अतिरिक्‍त जलसाठ्यांचे संवर्धन करणार
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलसुरक्षेला बळकटी देण्यासाठी टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र सरकारच्या मृदा व जलसंधारण विभागामध्ये सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये १,५०० अतिरिक्त जलसाठ्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे.

गेल्या तीन वर्षांत राबविण्यात आलेल्या सार्वजनिक-खाजगी-समुदाय सहभागाच्या जलसंधारण उपक्रमांतर्गत १,४५० हून अधिक जलसाठ्यांचे संवर्धन करण्यात आले असून ३,००० कोटी लिटरहून अधिक जलसाठवण क्षमता निर्माण झाली आहे. या उपक्रमाचा लाभ सुमारे सात लाख ग्रामीण नागरिकांना झाला आहे.

लवकरच मार्केटमध्ये एंट्री मारणार Maruti Grand Vitara 2026, जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि फीचर्स

विस्ताराचा पुढील टप्पा

या उपक्रमाचा पुढील टप्पा नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण विभागात राबविण्यात येणार आहे. पाणीटंचाईग्रस्त भागांमध्ये वर्षभर पाणी उपलब्ध करून देणे, भूजल पातळी वाढविणे आणि सिंचन सुविधा सुधारणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेच्या माध्यमातून विकेंद्रित आणि समुदाय-केंद्रित उपाययोजना राबवून दीर्घकालीन जलसुरक्षा निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. टाटा मोटर्सचा सहभाग हा राज्याच्या जलव्यवस्थापन प्रयत्नांना अधिक गती देणारा आहे.

टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी सांगितले की, शाश्वत जलउपाययोजनांसाठी सरकारी योजना, समुदायाचा सहभाग आणि दीर्घकालीन सहयोग यांवर कंपनीचा भर आहे. अंमलबजावणीसाठी Naam Foundation सोबत भागीदारी करण्यात आली आहे.

Kawasaki Bikes खरेदी करण्याची गोल्डन संधी! लाखो रुपयांची बचत होणार, जाणून घ्या Discount Offer

२०२५ मधील कामगिरी

एकट्या २०२५ मध्ये कंपनीने २५ जिल्ह्यांमध्ये १,००० जलसाठ्यांचे संवर्धन करून २,२५० कोटी लिटर अतिरिक्त जलसाठवण क्षमता निर्माण केली. यामुळे टँकरवरील अवलंबित्व कमी झाले असून पिण्याचे व सिंचनाचे पाणी उपलब्ध झाले आहे. अनेक शेतकरी एकाऐवजी दोन पिके घेऊ लागले आहेत, तर महिलांची पाण्यासाठी होणारी दैनंदिन धावपळ कमी झाली आहे.

जलसंधारण उपक्रमाची प्रगती

  • आर्थिक वर्ष २३-२४ : १०६ जलसाठे, ३ जिल्हे, १८६ कोटी लिटर क्षमता
  • आर्थिक वर्ष २४-२५ : ३५६ जलसाठे, १० जिल्हे, ६९० कोटी लिटर क्षमता
  • आर्थिक वर्ष २५-२६ : १,००० जलसाठे, २५ जिल्हे, २,२५० कोटी लिटर क्षमता
२०२४ पासून हा उपक्रम राज्याच्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेशी संलग्न आहे. जलसाठ्यांमधील गाळ काढून तो शेतांमध्ये वापरल्याने जमिनीची सुपीकता वाढत आहे. अचूक नियोजन, डिजिटल देखरेख, स्पष्ट जबाबदाऱ्या आणि समुदायाचा सहभाग यामुळे उपक्रमात पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यात आली आहे.

Web Title: Tata motors maharashtra government mou 1500 additional water reservoirs to be conserved in drought affected areas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 06:48 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • tata motors

संबंधित बातम्या

Mahindra BE6 खरेदी करण्याचे स्वप्न होईल साकार! EMI 25,000 पेक्षा कमी; जाणून घ्या डाउन पेमेंटचं गणित
1

Mahindra BE6 खरेदी करण्याचे स्वप्न होईल साकार! EMI 25,000 पेक्षा कमी; जाणून घ्या डाउन पेमेंटचं गणित

इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी! PM E-DRIVE बाबत सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
2

इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी! PM E-DRIVE बाबत सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Maruti Swift Vs Tata Punch: एक हॅचबॅक तर दुसरी एसयूव्ही; मात्र किंमत, फीचर्स आणि इंजिनच्या बाबतीत कोणती कार बेस्ट?
3

Maruti Swift Vs Tata Punch: एक हॅचबॅक तर दुसरी एसयूव्ही; मात्र किंमत, फीचर्स आणि इंजिनच्या बाबतीत कोणती कार बेस्ट?

Electric 2-Wheeler Sales:‘या’ एका कारणामुळे मार्च 2026 मध्ये इलेक्ट्रिक टू-व्हिलरच्या विक्रीत झपाझप झाली वाढ
4

Electric 2-Wheeler Sales:‘या’ एका कारणामुळे मार्च 2026 मध्ये इलेक्ट्रिक टू-व्हिलरच्या विक्रीत झपाझप झाली वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.