फोटो सौजन्य: YouTube
एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमंतीमुळे लोकं आता इलेक्ट्रिक तसेच सीएनजी कार्सकडे वळत आहे. ज्याप्रमाणे इलेक्ट्रिक कार्सला मार्केटमध्ये मागणी वाढत आहे. त्याचप्रमाणे सीएनजी कार्सची मागणी सुद्धा वाढत आहे. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेता, टाटा मोटर्सने आपल्या अनेक कार्स सीएनजी व्हर्जनमध्ये उपलब्ध केल्या आहेत.
आता लवकरच नेक्सॉन सीएनजी (Nexon CNG) मार्केटमध्ये मध्ये लाँच होण्याच्या तयारीत आहे. कंपनी आपल्या पंच, टियागो आणि टिगोरची विक्री पेट्रोल, इलेक्ट्रिक आणि CNG व्हर्जनमध्ये करत आहे. सध्या नेक्सॉन ही कार पेट्रोल, डीजल आणि इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये विकली जात आहे. जेव्हा ही कार सीएनजी व्हेरिएन्ट मार्केटमध्ये उपलब्ध होईल तेव्हा चार प्रकारच्या पॉवरट्रेनमध्ये ही उपलब्ध असेल.
टाटाच्या इतर मॉडेल्सप्रमाणेच नेक्सॉन सीएनजीमध्ये ट्विन सीएनजी सिलिंडर तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. परंतु इतर उत्पादनांप्रमाणे, नेक्सॉनमध्ये टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनसह CNG किट दिले जाईल. नेक्सॉन 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह 118 bhp पॉवर आणि 170 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे.
Nexon CNG मध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळण्याची शक्यता आहे. जर टाटा नेक्सॉनने CNG बरोबरच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणण्यात यशस्वी ठरले, तर ही कार CNG कार सोबत ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची सुविधा हवी असणाऱ्यांना आकर्षित करू शकते.
नेक्सॉन सीएनजी सप्टेंबर 2024 मध्ये भारतीय बाजारात दाखल होऊ शकते. ही कार कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी ब्रेझा सीएनजी कारला आव्हान देईल. CNG व्हेरिएन्टची किंमत नेक्सॉनच्या इतर मॉडेलपेक्षा 60,000 ते 80,000 रुपये जास्त असण्याची शक्यता आहे. तसेच या कारचे मायलेज 20-22 किमी प्रति किलोमीटर असू शकते.