फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये Tesla ने एंट्री मारली आहे. आपल्या मुंबईतील BKC येथे शोरूमचे उद्घाटन करत कंपनीने Tesla Model Y ही इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केली आहे. भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता, टेस्लाने योग्य वेळी आपली कार लाँच केली आहे. ही कार दोन व्हेरिएंटमध्ये लाँच झाली असून इम्पोर्ट ड्युटीमुळे याची किंमत अमेरिका आणि चीनमधील किंमतीपेक्षा जास्त आहे.
Tesla Model Y मुळे भारतातील इलेक्ट्रिक कार्सना जोरदार टक्कर मिळणार आहे. यातीलच एक कार म्हणजे BYD Sealion 7. या दोन्ही इलेक्ट्रिक कार्सपैकी, रेंज, फीचर्स, आणि किंमतीच्या बाबतीत कोणती कार बेस्ट आहे? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
Tesla Model Y मध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात येत आहेत. यात 15.4 इंच टचस्क्रीन, हीटेड आणि व्हेंटिलेटेड सीट्स, अँबियंट लाइट्स, रियर व्हील ड्राइव्ह, नऊ स्पीकर्स, एईबी, ब्लाइंड स्पॉट कोलिजन वॉर्निंग, टिंटेड ग्लास रूफ असे अनेक उत्तम फीचर्स आहेत.
फक्त ‘एवढ्या’ किमतीत Tesla Model Y आणाल घरी, ‘असा’ असेल डाउन पेमेंट आणि EMI चा हिशोब
दुसरीकडे, BYD Sealion 7 मध्ये 12 स्पीकर्स, वायरलेस फोन चार्जर, वॉटर ड्रॉप टेल लॅम्प, लोड करण्यासाठी वाहन, 15.6 इंच फिरणारी इन्फोटेनमेंट सिस्टम, , व्हेंटिलेटेड आणि हीटेड सीट्स, 128 कलरफुल अँबियंट लाइट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, हेड-अप डिस्प्ले अशी अनेक फीचर्स आहेत. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी, त्यात 11 एअरबॅग्ज, असे अनेक फीचर्स आहेत.
टेस्ला मॉडेल Y मध्ये कंपनीने कमी आणि लॉन्ग रेंज बॅटरी पर्यायांचा समावेश केला आहे. ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 500 आणि 622 किलोमीटरपर्यंत चालवता येते. दुसरीकडे, BYD Sealion 7 मध्ये बसवलेली बॅटरी या कारला 567 किलोमीटरची NEDC रेंज देते.
240 KM ची रेंज आणि 50 लिटरचे स्टोरेज ! Komaki ने लाँच केली ‘ही’ नवीन इलेक्ट्रिक बाईक
टेस्लाच्या मॉडेल वायची एक्स-शोरूम किंमत 59.89 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्याच्या टॉप व्हेरिएंट म्हणून देण्यात येणाऱ्या लाँग रेंज व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 67.89 लाख रुपये आहे. त्याच वेळी, BYD Sealion 7 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 48.9 लाख रुपये आहे. त्याचा प्रीमियम व्हेरिएंट या किमतीत खरेदी करता येईल. त्याच्या परफॉर्मन्स व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 54.90 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.