फोटो सौजन्य: @TeslaCamera (X.com)
भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. हीच वाढती मागणी इतर ऑटो कंपन्यांना आपल्या इलेक्ट्रिक कार लाँच करण्यास प्रोत्साहित करत असते. अशातच, लोकप्रिय ऑटो कंपनी Tesla ने इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केली आहे.
भारतात अनेक उत्तम ऑटो कंपन्या कार्यरत आहेत, त्यातच आता टेस्ला कंपनीची भर पडली आहे. टेस्लाने मार्केटमध्ये त्यांची मॉडेल वाय ही इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केली आहे. यासोबतच, टेस्लाने भारतात आपला पहिला शोरूम देखील मुंबईतील BKC येथे उघडला आहे.
टेस्ला मॉडेल वाय भारतात दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 59.89 लाख रुपये ते 67.89 लाख रुपये आहे. त्यांना लाँच करण्यासोबतच, कंपनीने एक फायनान्स प्लॅन देखील जारी केला आहे, ज्यानुसार आज आपण जाणून घेऊयात की टेस्ला मॉडेल वाय खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती डाउन पेमेंट करून दरमहा किती ईएमआय भरावा लागेल? मात्र, त्यापूर्वी या कारची किंमत जाणून घेऊयात.
Tesla Model Y भारतात लाँच झाल्याने ‘या’ ऑटो कंपन्यांचे टेन्शन वाढणार?
भारतीय बाजारात टेस्ला Model Y दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे, जे रियर-व्हील ड्राइव्ह (RWD) आणि लाँग रेंज रियर-व्हील ड्राइव्ह (RWD) आहेत. त्याच्या रियर-व्हील ड्राइव्ह व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 59.89 लाख रुपये आहे आणि ऑन-रोड किंमत 60,99,690 रुपयांपर्यंत जाते. त्याच वेळी, त्याच्या लाँग रेंज रियर-व्हील ड्राइव्हची एक्स-शोरूम किंमत 67.89 लाख रुपये आहे आणि ऑन-रोड किंमत 69,14,690 रुपयांपर्यंत जाते.
जर तुम्ही टेस्ला मॉडेल Y RWD व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. त्याची ऑन-रोड किंमत 60,99,690 रुपये आहे. तुम्हाला 10 टक्के म्हणजेच 6,09,969 रुपये डाउनपेमेंट करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला 5 वर्षांसाठी दरमहा 1,13,958 रुपये ईएमआय भरावा लागेल. यासाठी तुम्हाला 54,89,721 रुपये लोन घ्यावे लागेल. यावर तुम्हाला 9 टक्के व्याजदर देखील भरावा लागेल.
Tesla तर लाँच झाली, मात्र यातून सरकारची कमाई किती? जाणून घ्या संपूर्ण हिशोब
जर तुम्ही टेस्ला मॉडेल वाय लाँग रेंज आरडब्ल्यूडी व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याची ऑन-रोड किंमत 69,14,690 रुपये आहे. तुम्हाला 10 टक्के म्हणजेच 6,90,769 रुपये डाउन पेमेंट करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला 5 वर्षांसाठी दरमहा 1,29,053 रुपये ईएमआय भरावा लागेल. यासाठी तुम्हाला 62,16,921 रुपयांचे लोन घ्यावे लागेल. यावर तुम्हाला 9 टक्के व्याजदर देखील भरावा लागेल.