फोटो सौजन्य: Social Media
भारतीय बाजारात अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या उत्तम बाईक ऑफर करत असतात. पण ग्राहकांसाठी मायलेज हा एक महत्त्वाचा घटक बनला आहे. आजचा ग्राहक आपल्या बाईककडून उत्तम मायलेजची अपेक्षा ठेवतो, आणि याच कारणामुळे मायलेज देणाऱ्या बाईक्सची विक्री झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे दुचाकी उत्पादक कंपन्या कमी किमतीत उत्तम मायलेज देणाऱ्या बाईक ऑफर करत आहेत. बाजारातील स्पर्धा आणि ग्राहकांची बदलती अपेक्षा लक्षात घेऊन, कंपन्या अधिक प्रभावी आणि इंधन-कुशल बाईक्स तयार करत आहेत.
भारतीय बाजारपेठेत दुचाकी वाहने खूप लोकप्रिय आहेत. लोक दररोज घरातून ऑफिसला जाण्यासाठी स्वस्त स्कूटर आणि बाईक शोधत असतात. यासोबतच, चांगले मायलेज असलेल्या बाईक्सचाही खूप शोध सुरू आहे. भारतीय बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांच्या बाईक उपलब्ध आहेत.
रॉयल एन्फिल्डची झोप उडवायला आली ‘ही’ बाईक, फक्त 500 ग्राहकांना मिळेल खास सवलत
जर तुम्हीही नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आपण टीव्हीएस स्पोर्टबद्दल जाणून घेणार आहोत, जी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. आज आपण टीव्हीएस स्पोर्ट बाईकची ऑन-रोड किंमत, ईएमआय आणि डाउन पेमेंटबद्दल जाणून घेणार आहोत.
भारतीय बाजारात टीव्हीएस स्पोर्ट बाईक दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. दिल्लीमध्ये त्याच्या बेस व्हेरियंट स्पोर्ट सेल्फ स्टार्ट अलॉय व्हील्सची ऑन-रोड किंमत सुमारे 72 हजार रुपये आहे. त्याच्या टॉप व्हेरियंट स्पोर्ट सेल्फ स्टार्ट अलॉय व्हील व्हेरियंटची ऑन-रोड किंमत सुमारे 86 हजार रुपये आहे.
जर तुम्ही नवी दिल्लीमध्ये 10000 रुपयांचे डाउन पेमेंट देऊन बेस व्हेरियंट खरेदी केले तर तुम्हाला त्यासाठी 62000 रुपयांचे लोन घ्यावे लागेल. तुम्हाला हे लोन 9.7 टक्के व्याजदराने मिळेल. हे कर्ज फेडण्यासाठी, तुम्हाला 3 वर्षांसाठी दरमहा 2 हजार रुपये ईएमआय भरावा लागेल. हे कर्ज आणि व्याजदर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असतात.
10 हजारांपेक्षा कमी पैसे भरून Hunter 350 होईल तुमच्या नावावर, फक्त जाणून घ्या EMI चं संपूर्ण गणित
टीव्हीएस स्पोर्ट बाईकबाबत कंपनीचा दावा आहे की ही बाईक प्रति लिटर 70 किलोमीटरपेक्षा जास्त मायलेज देते. एकदा टाकी भरली की, ही बाईक 750 किमी पर्यंतचे अंतर कापू शकते.
यात टेलिस्कोपिक फोर्क आणि ट्विन शॉक अॅब्झॉर्बर आहेत. या बाईकचा टॉप स्पीड ताशी 90 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. बाजारात ही बाईक हिरो एचएफ 100, होंडा सीडी 110, ड्रीम आणि बजाज सीटी 110, एक्सशी स्पर्धा करते. Hero HF 100 मध्ये 97.6 cc इंजिन आहे, जे कंपनीने अपडेट केले आहे.