फोटो सौजन्य: Social Media
भारतात ज्याप्रमाणे लक्झरी कार्सची क्रेझ पाहायला मिळते, तशीच क्रेझ एसयूव्हीबद्दल सुद्धा असते. भारतातील अनेक दिग्गज मंडळी, राजकारणी, आणि बॉलिवूड सेलिब्रेटी ही कार वापरताना दिसतात. एसयूव्ही आकर्षक दिसण्यासोबतच दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. म्हणूनच तर देशात एसयूव्हीच्या विक्रीत सुद्धा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.
देशात अनेक ऑटो कंपनीजच्या एसयूव्ही उपलब्ध आहेत. पण महिंद्रा कंपनीच्या एसयूव्ही नेहमीच टॉपवर असतात. कंपनीच्या अनेक एसयूव्ही कार्स लोकप्रिय आहेत पण त्यातही महिंद्रा थारची मार्केटमध्ये वेगळीच हवा आहे.
हे देखील वाचा: Ola Electric च्या ‘या’ स्कूटरवर 15 हजार रुपयांची बचत करण्याची संधी, आजच घ्या लाभ
महिंद्रा थार ही देशातील सर्वात लोकप्रिय ऑफ-रोडर एसयूव्ही आहे. आता महिंद्र आपल्या आयकॉनिक 3-डोअर थारवर 3 लाख रुपयांपर्यंतची सूट देत आहे. या ऑफ-रोडर एसयूव्हीचे 5- डोअर मॉडेल थार रॉक्स लाँच झाल्यापासून, 3-डोर मॉडेलवर ऑफर उपलब्ध झाली आहे. यासह 5- डोअर मॉडेलच्या येण्याने महिंद्र थारचा वेटिंग पिरियड कमी झाला आहे.
महिंद्रा थ्री-डोअर थारवर उपलब्ध असलेल्या सवलतींमध्ये गेल्या काही महिन्यांत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला या एसयूव्हीवर 1.6 लाख रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स दिले जात होते. आता महिंद्रा थारवरील ही सवलत ऑफर 3 लाख रुपयांपर्यंत वाढली आहे.
तुम्हाला महिंद्र थारच्या अर्थ एडिशनवर जास्तीत जास्त फायदा घेता येईल. हा व्हेरियंट बाजारात पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरियंटसह उपलब्ध आहे. भारतीय बाजारपेठेत याचे चार व्हेरियंट आहेत, ज्यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय दिले आहेत.
या अर्थ एडिशनची एक्स-शोरूम किंमत 15.40 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 17.60 लाख रुपयांपर्यंत जाते. जर आपण बघितले तर, महिंद्र थारच्या बेस व्हेरियंटची किंमत 11.35 लाख रुपये आहे आणि त्याच्या टॉप-स्पेक व्हेरियंटची किंमत 17.60 लाख रुपये आहे.
महिंद्रा थार तीन पॉवरट्रेन पर्यायांसह येते. ही SUV TGDi सह 2.0-लिटर mStallion टर्बो पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे. या इंजिनमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन उपलब्ध आहेत. हे इंजिन 112 kW ची पॉवर प्रदान करते. ही कार मॅन्युअल ट्रान्समिशनसह 300 Nm टॉर्क आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 320 Nm टॉर्क जनरेट करते.
महिंद्रा थार 1.5-लिटर mHawk टर्बो डिझेल इंजिनसह सुसज्ज आहे. हे इंजिन 87.2 kW ची शक्ती प्रदान करते आणि 300 Nm टॉर्क जनरेट करते. ही SUV 2.2-लीटर mHawk टर्बो डिझेलच्या पर्यायासह देखील येते, जी 97 kW पॉवर आणि 300 Nm टॉर्क जनरेट करते.