Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता इंधनावर चालणाऱ्या कारला विसराच ! देशातील पहिली Solar Car लाँच, किंमत 4 लाखांपेक्षा कमी

भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो मध्ये अनेक अत्याधुनिक कार पाह्यला मिळत आहे. आता तर चक्क सोलार एनर्जीवर चालणारी कार या कार्यक्रमात पाहायला मिळाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 19, 2025 | 05:41 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सध्या देशात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अनेक कार उत्पादक कंपन्या देशात अत्याधुनिक इलेक्ट्रिक कार लाँच करत आहे. सततच्या इंधनातील दरवाढीमुळे कित्येक जण इलेक्ट्रिक कारला प्राधान्य देताना दिसत आहे. आता याही पुढे जात Vayve Mobility नावाच्या कंपनीने भारतातील पहिली सोलार एनर्जीवर चालणारी कार बनवली आहे.

भारत मोबिलिटी ग्लोअब्ल एक्स्पो 2025 मध्ये एकापेक्षाहून एक दर्जेदार कार पाहायला मिळाल्या आहेत. पण आता या कार्यक्रमात चक्क सोलार कार पाहायला मिळाली आहे. या कारचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

काय लूक आहे राव ! Auto Expo 2025 मध्ये BMW S 1000 RR आणि R 1300 GSA झाल्या लाँच

देशातील कार उद्योगात झपाट्याने बदल होताना दिसत आहेत. एकीकडे, इलेक्ट्रिक कारमध्ये नावीन्य दिसून येत आहे. तर आता सौरऊर्जेवर चालणारी कार भारतीय बाजारपेठेत दाखल झाली आहे. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 कार्यक्रमात, पुणे येथील इलेक्ट्रिक वाहन स्टार्ट-अप कंपनी वायवे मोबिलिटीने देशातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी कार ‘Vayve Eva’ लाँच केली आहे. ३ मीटरपेक्षा कमी लांबीच्या या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची किंमत फक्त ३.२५ लाख रुपये, एक्स-शोरूम आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार एकदा चार्ज केल्यावर २५० किमी पर्यंतची रेंज देईल.

Vayve Eva ची व्हेरियंटनुसार किंमत

या सोलार कारची किंमत त्याच्या व्हेरियंटनुसार वेगळी असणार आहे. Vayve Eva तीन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे., ज्यांची नावं Nova, Stella, आणि Vega असे आहे. यातील नोव्हा व्हेरियंटची किंमत 3.25 लाख रुपये आहे. स्टेलाची किंमत 3.99 लाख रुपये आहे तर वेगाची किंमत 4.49 लाख रुपये असणार आहे.

फक्त ८० पैशांमध्ये १ किमीचे अंतर कापेल

या सोलर कारच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, त्यात दिलेला सोलर पॅनल कारच्या सनरूफच्या जागी वापरता येतो. यासह, या कारचा १ किमी चालण्याचा खर्च फक्त ८० पैसे आहे. कंपनीचा असा दावा आहे की ही देशातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक कार आहे. यात पुढच्या बाजूला एकच सीट आणि मागच्या बाजूला थोडी रुंद सीट आहे. ज्यावर एक मूल प्रौढांसोबत बसू शकते. या कारची ड्रायव्हिंग सीट ६ प्रकारे अ‍ॅडजेस्ट करता येते. याशिवाय कारमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ देण्यात आला आहे. त्यात रिव्हर्स पार्किंग कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

खूप झाली CNG बाईकची हवा ; आता मार्केटमध्ये CNG Scooter मारणार एंट्री, Auto Expo 2025 मध्ये दिसली झलक

अ‍ॅपल अँड्रॉइड सिस्टम उपलब्ध

कारमध्ये अ‍ॅपल-अँड्रॉइड सिस्टम उपलब्ध असेल. यामध्ये एसीसह अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी सिस्टम आहे. त्याची लांबी ३०६० मिमी, रुंदी ११५० मिमी, उंची १५९० मिमी आणि ग्राउंड क्लीयरन्स १७० मिमी आहे. या कारच्या पुढच्या बाजूला स्वतंत्र कॉइल स्प्रिंग सस्पेंशन आणि मागील बाजूला ड्युअल शॉक सस्पेंशन आहे. यात पुढच्या चाकांमध्ये डिस्क ब्रेक आणि मागच्या चाकांमध्ये ड्रम ब्रेक आहेत. इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंगने सुसज्ज असलेल्या या कारचा टर्निंग रेडियस ३.९ मीटर आहे. या रियर व्हील ड्राइव्ह कारचा टॉप स्पीड ७० किमी/तास आहे.

45 मिनिटात होणार फुल्ल चार्ज

ही सोलार कार फक्त ५ सेकंदात ० ते ४० किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठू शकते. त्याच वेळी, ही पूर्ण चार्ज होण्यासाठी फक्त ४५ मिनिटे लागतील. त्यामुळे आता या कारला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळणार का याकडे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Vayve eva india first solar car is launched at auto expo 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2025 | 05:41 PM

Topics:  

  • new car

संबंधित बातम्या

Maruti Fronx Hybrid केव्हा लाँच होणार? जाणून घ्या अपेक्षित किंमत
1

Maruti Fronx Hybrid केव्हा लाँच होणार? जाणून घ्या अपेक्षित किंमत

नुकतेच लाँच झालेली Maruti Victoris फुल टॅंकवर किती KM धावेल? किती असेल मायलेज?
2

नुकतेच लाँच झालेली Maruti Victoris फुल टॅंकवर किती KM धावेल? किती असेल मायलेज?

Volvo EX30 ची भारतीय मार्केटमध्ये दिमाखात एंट्री! ‘या’ किमतीत मिळेल प्री-रिजर्व्हची संधी
3

Volvo EX30 ची भारतीय मार्केटमध्ये दिमाखात एंट्री! ‘या’ किमतीत मिळेल प्री-रिजर्व्हची संधी

केव्हा लाँच होणार Tata Punch Facelift? किती असेल किंमत? जाणून घ्या एका क्लिकवर
4

केव्हा लाँच होणार Tata Punch Facelift? किती असेल किंमत? जाणून घ्या एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.