काय लूक आहे राव ! Auto Expo 2025 मध्ये BMW S 1000 RR आणि R 1300 GSA झाल्या लाँच
भारतात अनेक लक्झरी वाहन उतपदक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार आणि बाईक ऑफर करत असतात. यातीलच एक विश्वासाचे नाव म्हणजे बीएमडब्ल्यू. आजही कंपनीच्या बाईक किंवा कार रस्त्यावरून जाताना दिसल्यावर अनेक जणांच्या नजर त्यावर रोखल्या जातात.
बीएमडब्ल्यूच्या वाहनांना भारतात चांगली मागणी आहे. त्यामुळेच तर कंपनी नवनवीन वाहनं देशात लाँच करत असते. आता भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये बीएमडब्ल्यूच्या दोन नवीन बाईक्स लाँच झाल्या आहेत.
भारत मोबिलिटी एक्स्पो 2025 मध्ये बीएमडब्ल्यूने दोन उत्तम बाईक्स लाँच केल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे BMW R 1300 GS Adventure आणि BMW S 1000 RR. R 1300 GSA ही कंपनीची सर्वोत्तम अॅडव्हेंचर बाईक आहे आणि S 1000 RR ही कंपनीची प्रमुख सुपरस्पोर्ट 1000cc बाईक आहे. या दोन्ही BMW बाईक कोणत्या फीचर्ससह लाँच करण्यात आल्या आहेत त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
ही बीएमडब्ल्यूची एक अॅडव्हेंचर बाईक आहे. कंपनीने ती भारतात 22,95,000 रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लाँच केली आहे. या बाईकची रचना वेगळी आणि बॉक्सी आहे, ज्यामुळे ती BMW R 1300 GS पेक्षा खूपच वेगळी दिसते.
BMW R 1300 GS Adventure मोटरसायकलमध्ये 1300cc लिक्विड-कूल्ड बॉक्सर इंजिन वापरले आहे जे 145PS पॉवर आणि 149Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन स्लिप-अँड-असिस्ट क्लचसह ६-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
या बाईकमध्ये पूर्णपणे एलईडी लाइटिंग, १०.२५-इंच टीएफटी इन्स्ट्रुमेंट स्क्रीन, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि चार रायडिंग मोड्स आहेत – इको, रेन, रोड आणि एंड्युरो. तसेच ही बाईक ट्रॅक्शन कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, हिल-होल्ड असिस्ट, हीटेड ग्रिप्स आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) ने सुसज्ज आहे. या बाईकमध्ये चावीशिवाय ऑपरेशनसाठी की फोब देखील आहे.
BMW R 1300 GS Adventure सोबत, S 1000 RR देखील लाँच करण्यात आले आहे. ही बीएमडब्ल्यूची हाय परफॉर्मन्स असलेली सुपरस्पोर्ट बाईक आहे. त्यात विंगलेट्स आहेत, जे या बाईकचा स्पोर्टी लूक आणखी वाढवतात. २०२५ ची BMW S 1000 RR भारतात २१.१० लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली आहे.
2025 बीएमडब्ल्यू एस १००० आरआरमध्ये ९९९ सीसी इनलाइन-फोर इंजिन वापरले आहे, जे २०८ पीएस पॉवर आणि ११२.५ एनएम टॉर्क निर्माण करते. बाईकचे इंजिन ६-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे, ज्यामध्ये स्लिप-अँड-असिस्ट क्लच आणि मानक म्हणून बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टर आहे.
या बाइकच्या अंडरपिनिंगमध्ये 45 मिमी इन्व्हर्टेड फोर्क्स आणि मोनोशॉक सस्पेंशन सेटअप, समोर ड्युअल ३२० मिमी डिस्क आणि मागील बाजूस 220 डिस्क ब्रेक यांचा समावेश आहे. त्यामुळे अचानक बाईक थांबवणे खूप सोपे होते.
या बाईकच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह ६.५-इंच रंगीत TFT आणि ट्रॅक्शन कंट्रोल, रायडिंग मोड्स, कॉर्नरिंग ABS, क्रूझ कंट्रोल, लाँच कंट्रोल, स्लाइड कंट्रोल, ब्रेक स्लाइड असिस्ट आणि व्हीली कंट्रोलसह अनेक उच्च दर्जाचे फीचर्स दिले गेले आहेत