फोटो सौजन्य: Freepik
गाडी घेताना विविध गोष्टींची काळजी आपण घेत असतो. परंतु जर तुम्ही लोनवर गाडी घेत असाल तर मग २० /४ /१० चा नियम तुम्हाला माहित असणं खूपच गरजेचे आहे. या नियमाच्या मदतीने तुम्हाला कार लोन घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे कळण्यास मदत होईल. यासोबतच हा नियम तुम्हाला कारसाठी किती डाऊन पेमेंट करावे लागेल हे देखील सांगेल.
अलीकडच्या काळात लोक लक्झरी म्हणून नव्हे तर आपल्या गरजांसाठी गाड्या खरेदी करताना दिसत आहेत. याशिवाय बँकांकडून कार लोन सहज उपलब्ध होत असल्याने लोक मोठ्या संख्येने कार खरेदी करत आहेत. पण येथे तुम्हाला एका नियमाबद्दल माहित असणं खूपच गरजेचे आहे ज्यामुळे तुम्हाला कार लोन घेताना खूप मदत होईल. तो नियम म्हणजे २० /४ /१० चा नियम.
कार कर्ज घेताना २० /४ /१० नियम खूप उपयुक्त आहे. हा नियम तुम्हाला कोणत्या किंमतीला आणि किती कालावधीसाठी कार लोन घ्यावा हे सांगू शकतो. या नियमानुसार तुम्हाला गाडी तेव्हा परवडू शकते, जेव्हा तुम्ही कारचे तीनही नियम पूर्ण करता.
२० /४ /१० च्या नियमानुसार, २० चा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही कार खरेदी करणार असाल तेव्हा तुम्ही किमान २० टक्के किंवा त्याहून अधिक डाउन पेमेंट करावे. तुम्ही असे केल्यास, या नियमाची पहिली आवश्यकता तुम्ही पूर्ण करता.
२० /४ /१० च्या नियमात ४ म्हणजे तुम्ही किती वर्षांसाठी कर्ज घ्यावे. ग्राहकांनी 4 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी कर्ज घ्यावे असा हा नियम सांगतो. म्हणजेच तुम्ही जास्तीत जास्त 4 वर्षांसाठी कर्ज घ्यावे. या नियमानुसार तुम्ही अशी गाडी खरेदी करावी ज्याचे कर्ज तुम्ही 4 वर्षांच्या आत फेडू शकता.
२० /४ /१० मधील १० नियम सांगतो की तुमचा एकूण वाहतूक खर्च (कार EMI सह) तुमच्या मासिक पगाराच्या १० टक्क्यांपेक्षा कमी असावा. EMI सोबत, यामध्ये इंधन आणि देखभालीचा खर्च देखील समाविष्ट आहे. या नियमानुसार तुम्ही अशी कार खरेदी करावी ज्यात या तिन्ही गरजा पूर्ण होऊ शकतील.