फोटो सौजन्य: Social Media
दिवाळी सुरु होण्यास अगदी काहीच दिवसांचा अवधी राहिला आहे. या शुभ काळात अनेक जण नवनव्या गोष्टी खरेदी करत असतात. त्यालाच एक गोष्ट म्हणजे नवीन बाईक किंवा कार. प्रत्येक व्यक्तीची एक ड्रीम बाईक असतेच. तरुणांच्या ड्रीम बाईकबद्दल बोलायचे झाल्यास प्रत्येकाची निवड वेगळी असेल परंतु जास्तीजास्त तरुण आजही बुलेट म्हणजेच रॉयल एन्फिल्डच्या बाईक्सना आपली ड्रीम बाईक मानतात.
बुलेट चालवण्यात आणि इतर बाईक चालवण्यात आम्हाला जमीन आस्मानचा फरक वाटतो असे बोल प्रत्येक तरुणाचे असतात. म्हणूनच कंपनी सुद्धा नवीन बाईक्स लाँच करत असते.
भारतीय बाजारपेठेत, रॉयल एनफिल्ड 350 ते 650 सीसी पर्यंतच्या उत्कृष्ट बाईक्स विक्रीसाठी उपलब्ध करून देते. दिवाळी 2024 नंतर कंपनी आणखी एक नवीन बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे. बाईक लाँच करण्यापूर्वी त्याचा टीझरही सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. कंपनी कोणत्या तारखेला ही बाईक लाँच करेल याबद्दल आपण जाणून घेऊयात.
रॉयल एनफिल्ड लवकरच भारतीय बाजारपेठेत नवीन बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी 650 cc सेगमेंटमध्ये Interceptor Bear 650 लाँच करणार आहे. लॉन्च होण्यापूर्वी त्याचा टीझर रॉयल एनफिल्डने सोशल मीडियावर रिलीज केला आहे.
सध्या ही बाईक कोणत्या फीचर्ससह आणली जाईल याबाबत टीझरवरून कोणतीही माहिती उपलब्ध करण्यात नाही आली आहे. पण ही बाईक 5 नोव्हेंबरला लाँच होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. यात अनेक उत्तमोत्तम फिचर्स दिले जातील अशी अपेक्षा आहे.
हे देखील वाचा: इंजिन ओव्हरहीट होत असल्यास ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष, अन्यथा होईल खिसा रिकामा
मिळालेल्या माहितीनुसार, बाईकमध्ये अलॉय व्हील्सऐवजी स्पोक व्हील देण्यात येणार आहेत. डिस्क ब्रेक पुढील आणि मागील चाकांवर उपलब्ध असतील. बाईकमध्ये ड्युअल चॅनल एबीएस, एलईडी लाईट्स, राउंड शेप स्पीडोमीटर, स्क्रॅम्बलर स्टाइल सीट, यूएसडी फोर्क्स देण्यात येणार आहेत.
रॉयल एनफिल्डकडून येणाऱ्या नवीन बाईकमध्ये 648 सीसी क्षमतेचे एअर/ऑइल कूल्ड इंजिन असेल. यामुळे बाईकला 47 BHP चा पॉवर आणि 52.3 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळेल. बाईक 6 स्पीड गिअरबॉक्ससह आणली जाईल. ज्यासोबत 17 आणि 18 इंचाचे व्हील्स देण्यात येणार आहेत.
बाईकच्या लाँचसोबतच कंपनीकडून नेमकी किंमतीची माहिती दिली जाईल. परंतु अशी अपेक्षा आहे की ही बाईक 3.50 लाख रुपयांच्या अपेक्षित एक्स-शोरूम किंमतीच्या आसपास लाँच केली जाईल.
रॉयल एनफील्ड इटलीतील मिलान येथे होणाऱ्या EICMA 2024 मध्ये आपल्या अनेक बाईक्स सादर करेल. या कार्यक्रमात कंपनीची पहिली इलेक्ट्रिक बाईकही सादर केली जाणार आहे. याशिवाय, कंपनी अपडेटसह आणखी अनेक बाइक लाँच करण्याच्या तयारीत आहे.