फोटो सौजन्य: Freepik
आपली स्वतःची कार विकत घेणे हे प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीचे स्वप्न असते. तसेच अनेक जण हे स्वप्न पूर्ण देखील करतात. परंतु अनेक वेळा आपल्याला सवय असते की एखादी नवीन गोष्ट घेतली की तिच्यावरील कव्हर हटवायचे नाही. हीच गोष्ट आपण कारच्या बाबतीत सुद्धा घडते.
नवीन कार खरेदी केल्यानंतर, तुम्ही असे अनेक लोक पाहिले असतील ज्यांनी कारचे पॉलिथिन कव्हर काढलेले नाही. तुम्ही जर यामागचे कारण एखाद्या व्यक्तीस विचाराल तर त्याचे उत्तर असेल की अहो भाऊ, काही दिवस राहूद्या असेच, वाटले पाहिजे की नाही नवीन गाडी घेतली आहे. पण कारवर जास्त वेळ पॉलिथिनचे कव्हर ठेवल्याने नुकसान होऊ शकते. म्हणून आज आपण नवीन कार खरेदी केल्यानंतर किती दिवसांनी पॉलिथिनचे कव्हर काढावे याबद्दल जाणून घेणार आहोत.
हे देखील वाचा: लक्झरी कारची लक्झरी किंमत! Rolls Royce Cullinan facelift भारतात झाली लाँच
कंपन्या नवीन कारच्या सीटवर पॉलिथिन कव्हर लावतात जेणेकरून डिलिव्हरीपूर्वी कारच्या सीटवर कोणतेही डाग किंवा कट लागू नये व सीटचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये.
कारची डिलिव्हरी घेतल्यानंतर अनेकजण सीटवर पॉलिथीन कव्हर तसेच ठेवतात, पण असे करणे योग्य नाही. पॉलिथीन कव्हर जास्त वेळ चालू ठेवल्याने अनेक नुकसान होऊ शकतात. हे लक्षात घेता, नवीन कार खरेदी केल्यानंतर ताबडतोब कारच्या सीटवरील पॉलिथिनचे कव्हर काढून टाकावे.
हे देखील वाचा: परतीच्या पावसामुळे तुमच्या कारमधील इंटिरिअरची लागू शकते वाट, आजच टाळा ‘या’ चुका