फोटो सौजन्य: Freepik
महाराष्ट्रात हल्ली परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईसह अन्य मुख्य शहरांमध्ये परतीच्या पावसाने चांगलीच बॅटिंग केली आहे. याचा फटका प्रत्येक नागरिकाला बसला आहे. अनेक शहरात पाणी साचल्याने कित्येकांच्या गाड्या जागच्या जागीच बंद पडल्या आहेत. यातही जर कार असेल तर अजूनच समस्या उद्भवू शकतात. तसेच या पावसाच्या मोसमात आपण खालील चुका करणे टाळले पाहिजे अन्यथा आपल्या कारच्या इंटिरिअर त्याचा चांगलाच फटका बसू शकतो.
जर तुम्ही पावसात भिजलात किंवा ओली छत्री घेऊन गेलात, तर कारच्या सीट आणि फ्लोअर मॅट्स ओल्या होऊ शकतात. यामुळे सीट्सवर बुरशी, दुर्गंधी आणि डाग येऊ शकतात. कारमध्ये बसण्यापूर्वी तुमचे ओले कपडे आणि छत्री नेहमी प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा.\
हे देखील वाचा:कारला दुसऱ्या रंगाचा पेंट दिल्याने भरावा लागतो दंड? जाणून घ्या काय सांगतात नियम
पावसात, शूज चिखल किंवा पाण्याने घाण होऊ शकतात, ज्यामुळे कारच्या फ्लोअर मॅट्स आणि कार्पेट खराब होऊ शकते. यामुळे कार तर घाण होईलच पण त्यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशीही कारमध्ये पसरली जाईल. अशा परिस्थितीत, कारमध्ये प्रवेश करण्यापूर्वी शूज स्वच्छ करा किंवा कारमध्ये रबरी फ्लोअर मॅट वापरा जी स्वच्छ करणे सोपे होईल.
पावसादरम्यान, कारमध्ये जास्त ओलावा असू शकतो, ज्यामुळे कारच्या काचेवर धुके येऊ लागतात. जर तुम्ही एअर कंडिशनरचा योग्य वापर केला नाही तर त्यामुळे धुकं अजून वाढतील आणि बुरशीची निर्मिती होऊ शकते. नेहमी एसी योग्य मोडमध्ये ठेवा जेणेकरून आतील भाग कोरडे राहील आणि काच स्वच्छ राहील.
पावसाळ्यात कारच्या आत ओलावा राहिल्यास इंटिरिअरला बुरशीची लागण होऊ शकते. यासाठी तुम्ही कारमध्ये सिलिका जेलची पॅकेट किंवा ओलावा शोषणारी उत्पादने ठेवू शकता जे ओलावा शोषून घेतात.
जर कारच्या आतून कोठूनही पाणी येत असेल तर ताबडतोब त्याची तपासणी करा, कारण सतत पाणी साचल्याने कारच्या फरशीचे आणि इलेक्ट्रॉनिक्सचे नुकसान होऊ शकते.