फोटो सौजन्य्य: Istock
हवेचा दर्जा खालावण्याच्या संकटाचा सामना करत असलेल्या भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे, जे अत्यंत चिंताजनक आहे. जगातील अव्वल 100 सर्वात प्रदूषित शहरांपैकी 83 शहरे भारतात आहेत, जेथे वायू प्रदूषणाचा दररोज 5 वर्षांखालील 464 मुलांवर परिणाम होत आहे. हा सायलण्ट किलर आता तंबाखू व मधुमेहापेक्षा मृत्यूचे प्रमुख कारण बनत चालला आहे आहे, ज्यामुळे 2047 पर्यंत विकसित अर्थव्यवस्था बनण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षांमध्ये अडथळा येण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या संकटामधील प्रमुख कारणीभूत घटक म्हणजे वाहनांमधून होणारे उत्सर्जन. संपूर्ण विश्व शाश्वत गतीशीलतेला प्राधान्य देत असताना इलेक्ट्रिक वेईकल्स (ईव्ही) महत्त्वपूर्ण सोल्यूशन ठरल्या आहेत. नॉर्वे, चीन, जर्मनी यांसारख्या देशांनी ईव्हींचा अवलंब केला आहे आणि आपला शेजारील देश नेपाळ देखील मोठी प्रगती करत आहे. भारतात बदल होत आहे, जेथे ईव्हीच्या किंमतीमुळे जागरूक ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उभारण्याचे प्रमाण वाढत आहे. आपल्याला अपेक्षा नसलेली शहरे व ठिकाणांमध्ये देखील दररोज अधिकाधिक चार्जिंग स्टेशन्स उभारताना पाहायला मिळत आहेत. आजच्या युगातील कार खरेदीदारांसाठी ईव्ही योग्य पर्याय असण्यामागील हे एक मोठे कारण आहे.
हे देखील वाचा: लकी कारला देण्यात आला अनोखा निरोप ; 1500 लोकांना देण्यात आले जेवण
जागतिक सर्वेक्षणांमधून या इलेक्ट्रिफाइंग परिवर्तनासाठी विविध लक्षवेधक कारणे निदर्शनास येतात, जसे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम, कमी मालकीहक्क खर्च, उत्साहवर्धक ड्रायव्हिंग अनुभव आणि शांतमय राइडचा आनंद.
आम्ही राज्यातील विविध ईव्ही मालकांना त्यांचे मत विचारले आणि त्यांचा अभिप्राय अत्यंत सकारात्मक होता. अनेकांनी इलेक्ट्रिक वेईकलचा अवलंब करण्याप्रती त्यांच्या निर्णयामध्ये मित्र व ईव्ही समुदायांकडून करण्यात आलेल्या शिफारशी महत्त्वपूर्ण ठरल्याचे सांगितले. परदेशातील अनुभवांमधून प्रेरित असो किंवा पर्यावरणाप्रती जागरूक नागरिक बनण्याची इच्छा असो हे मालक आपल्या मतावर ठाम आहेत, ते म्हणजे एकदा इलेक्ट्रिक व्हेईकलचा अवलंब केल्यानंतर कधीच मागे वळून पाहणार नाही.
मुंबईतील बँकर नितीन कामत म्हणाले, ”ईव्ही ड्राइव्ह करण्याचा अनुभव उत्साहवर्धक आहे. यामधून अत्यंत शांतमय, आरामदायी प्रवासाचा आनंद मिळतो, तसेच मी शुद्ध हवेप्रती योगदान देत असल्याचे समाधान मिळते. सध्या हवेचा दर्जा खालावण्याचे संकट ओढावले असल्याने आपण सर्वांनी ग्रीन भारत घडवण्याच्या दिशेने पाऊल उचलण्याची गरज आहे.”
पुण्यातील कापड व्यवसायाचे मालक प्रभात कुमार यांच्यासाठी ईव्ही मालकीहक्काचे आर्थिक फायदे निर्विवाद आहेत. ते म्हणाले, ”मी इंधनासाठी होणाऱ्या खर्चासंदर्भात मोठ्या प्रमाणात बचत करतो, तसेच घरीच वेईकल चार्जिंग करण्याच्या सोयीसुविधेचा आनंद घेत आहे. माझ्यासाठी ही उत्साहवर्धक व समाधानकारक बाब आहे.”
नागरिक म्हणून आपली पर्यावरणाप्रती सकारात्मकपणे योगदान देण्याची जबाबदारी आहे. नागपूरमधील शालेय शिक्षिका निशी गोयल यांचे या बाबीला प्रबळ समर्थन आहे. त्या म्हणाल्या, ”दरवर्षी आपल्या हवेचा दर्जा खालावत आहे. ईव्हीची निवड करत मी भावी पिढीसाठी शुद्ध पर्यावरण व आरोग्यदायी भविष्याप्रती माझे योगदान देत आहे.”