फोटो सौजन्य: YouTube
सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या वाढत्या किंमती. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनं खूप सोयीस्कर आहे. त्यामुळेच अनेक वाहन उत्पादक कंपनीज सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे.
नुकतेच बजाजने आपली इलेक्ट्रिक स्कुटर बजाज चेतक ला लाँच केले होते. ही स्कुटर लाँच होताच अनेकांनी ही स्कुटर बुक करण्यासाठी धाव घेतली आहे. जर तुम्ही सुद्धा ही स्कुटर बुक करण्याच्या तयारीत असाल ते ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे कारण म्हणजे बजाजने आणलेली एक दमदार ऑफर.
बजाज चेतकने आपल्या प्रीमियम स्कूटरवर 20 हजार रुपयांपर्यंत बचतीची ऑफर आणली आहे. पण ही ऑफर मर्यादित काळासाठीच उपलब्ध आहे. बजाजच्या दाव्यानुसार, पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत या इलेक्ट्रिक प्रीमियम स्कूटरवर एका वर्षात सुमारे 38 हजार रुपयांची बचत होऊ शकते. ही ऑफर अधिक जाणून घेण्यासाठी नजीकच्या बजाजच्या शोरूमला भेट द्या.
बजाज चेतक प्रीमियम एका चार्जवर 126 किलोमीटरची रेंज ऑफर करण्याचा दावा करते. या स्कूटरला फुल्ल चार्ज करण्यासाठी 4 तास 30 मिनिटे लागतात. ही इलेक्ट्रिक स्कूटर इको आणि स्पोर्ट्स मोडमध्ये ऑपरेट केली जाऊ शकते. तसेच ही EV ताशी 73 किमी वेगाने धावू शकते. बजाजने ही प्रीमियम स्कूटर तीन कलर ऑप्शनसह आणली आहे.
बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये नवीन 5-इंचाची TFT स्क्रीन आहे. तुम्हाला या स्क्रीनवर म्युजिक आणि कॉलशी संबंधित सूचना मिळतील. या स्कूटरमध्ये नेव्हिगेशन फीचरचाही समावेश करण्यात आला आहे. यासाठी, तुम्हाला कनेक्टिंग ॲपवर फक्त तुमची डेस्टिनेशन टाकावी लागेल. यानंतर तुम्हाला स्क्रीनवर अनेक रूट्सची माहिती मिळेल.
चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये हिल होल्ड असिस्ट, रिव्हर्स मोड, ऑन-बोर्ड चार्जिंग, की-फोब यांसारखी फीचर्स सुद्धा जोडण्यात आली आहेत. बजाज चेतकच्या या प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1,47,243 रुपयांपासून सुरू होते. ही स्कूटर ब्रुकलिन ब्लॅक, इंडिगो ब्लू आणि हेझलनट रंगांमध्ये बाजारात उपलब्ध आहे.