Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रासंगिक : राष्ट्रभक्त नाटककार नाट्याचार्य कृ. प्र. खाडिलकर

अनेक वर्षे लोटली तरी आजही मानापमान म्हटले की नाट्यगीतांच्या बरसातीचा आनंद रसिक मायबाप पुरेपूर घेतात. त्या कलाकृतीवर सिनेमा येतोय म्हणे !! बघा मग जुने ते सोनेच म्हणावे लागेल मानापमान नाटकातील ‘नमन नटवरा विस्मयकारा’ या नांदीप्रमाणेच विस्मयकारक प्रतिभा आणि आयुष्य लाभलेले झुंजार नाटककार. म्हणजे काकासाहेब...!

  • By Vivek Bhor
Updated On: Nov 27, 2022 | 06:01 AM
प्रासंगिक : राष्ट्रभक्त नाटककार नाट्याचार्य कृ. प्र. खाडिलकर
Follow Us
Follow Us:

नाट्याचार्य’ ही सार्थ उपाधी लाभलेल्या कैलासवासी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांची आज १५० वी जयंती..! या निमित्त प्रत्येक रंगकर्मींना त्यांचे पुण्यस्मरण नाही झाले तरच आश्चर्य !

सीनें में ज़ुनू, आँखों में देंशभक्ति की चमक रखता हुँ।
दुश्मन की साँसें थम जाए,
कलम में वो धमक रखता हुँ।

या एका धारदार शेरामध्येच खाडिलकरांच्या वीरश्रीपूर्ण जीवनाचे मर्म दडलेले आहे!

नाट्य लेखनाची उपजतच प्रतिभा आणि हातोटी असणाऱ्या खाडिलकरांनी पहिले नाटक शाळेत तिसऱ्या इयत्तेत असतानाच लिहिले. पण त्यामुळे त्याकाळचे वर्गशिक्षक संतापले आणि त्यांचे पहिले नाटक अग्नीत स्वाहा झाले! ते म्हणत की माझे पहिले नाटक अग्नीच्या माध्यमातून देवाला अर्पण झाले. लोकमान्य टिळकांच्या केसरीकडे खाडिलकर गेले ते स्वतःचे मोठे नाट्य गुण घेऊनच गेले. किंबहुना त्यांनी बी.ए.च्या अखेरच्या वर्षाला असताना लिहिलेले ‘सवाई माधवरावांचा मृत्यू’ हे नाटक आणि ‘ब्राह्मण त्याची विद्या’ या ग्रंथावरील टीकात्मक अभिप्राय गाजलेला पाहूनच टिळकांनी त्यांना केसरीत घेतले. म्हणूनच खाडिलकर स्वतःला प्रथम नाटककार मग पत्रकार असे म्हणत.

संगीत रंगभूमीवरील अजरामर कलाकृतींच्या निर्मितीमधील आणखी एक गाजलेले नाटक म्हणजे ‘संगीत स्वयंवर’…!! हे नाटक खाडिलकरांकडून मिळाले तेव्हा बालगंधर्वांनी किर्लोस्कर मंडळीपासून विभक्त होऊन स्वतंत्र गंधर्व नाटक मंडळींची स्थापना केली. त्यामुळे बालगंधर्व आणि त्यांच्या नाटक कंपनीने स्वयंवर नाटकाच्या निर्मितीमुळे यशोशिखर गाठले! कृष्णरुक्मिणीची प्रेमकथा अत्यंत मार्मिक पद्धतीने मांडण्याची खाडीलकरांची हातोटी रसिकांना आकर्षित करू लागली. बालगंधर्वांना या कलाकृतीचा भरघोस फायदा झाला. यानंतर मागोमाग संगीत द्रौपदी, संगीत मेनका व त्याचबरोबर गद्य नाट्यनिर्मितीमध्ये सवतीमत्सर, किचकवध या नाट्य निर्मितीचे अनमोल योगदान रंगभूमीस खाडिलकरांनी दिले.

एकदा ते सांगलीत असताना एक नाट्यसमीक्षक त्यांच्या भेटीस आले आणि म्हणाले की, ‘किचकवध नाटकाचा शेवट वेगळा केला असता तर अधिक चांगले झाले असते. ‘नाट्याचार्यांनी त्याला एवढेच उत्तर दिले, ‘की मी जे केले तेच बरोबर आहे’! त्या मागे त्यांचे चिंतन होते. त्यांच्या चिंतनशीलतेमुळे त्यांना वैचारिक आसन लाभले, त्यामुळेच त्यांची नाटके उदात्त पातळीवर गेली ! सखोल चिंतनशीलता आणि वीरवृत्ती ही खाडिलकरांसह त्यांच्या नाटकांची दोन आयुधे आहेत. अजून असे म्हणता येईल की एका हातात चिंतनशीलता आणि दुसऱ्या हातात वीरवृत्ती धारण करून खाडिलकर रंगभूमीवर प्रवेश करत असत. वीरवृत्ती हे त्यांचे शस्त्र होते, तर चिंतनशीलता ही शूरवीर वृत्तीचे शस्त्र होते. ‘इदं शस्त्रम ईदं शास्त्रम्।’ असे म्हणत त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले व नाट्यसृष्टी जिंकली.

नाट्य निर्मिती व लेखन हा त्यांचा जीवकीप्राण झाला होता. त्यात गद्य नाटके ही रंगभूमी गाजवत होती. त्यातीलच कीचकवध या नाटकाने अनेक विक्रम केले. महाराष्ट्र नाटक मंडळीतील नटांना किचकवधानेच फार मोठा लौकिक मिळवून दिला. किंबहुना नावलौकिकाच्या शिखरावरच नेले. महाराष्ट्र नाटक मंडळींचे मालक दत्तोपंत देशपांडे यांचे उद्गार आहेत, ‘जे काही आम्ही आज आहोत ते केवळ खाडिलकरांमुळेच..!’ आम्हाला मिळालेली कीर्ती आणि संपत्ती दोन्हीही खाडिलकरांनीच मिळवून दिली. कीचकवध नाटक पहिल्याच प्रयोगापासून अतोनात गाजत राहिले पण या अमाप यशाला गालबोट लागले! १९१० साली या नाटकावर ब्रिटिश सरकारची बंदी आली. ब्रिटिश सरकारची बंदी आलेले हे पहिले नाटक होय.

खाडिलकरांची सर्वच नाटके ही वीरश्री पूर्ण, स्वातंत्र्याचा जागर करणारी आणि जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करणारी होती. त्यांच्या ‘कीचकवध’ नाटकावर ब्रिटिशांनी जेव्हा बंदी घातली तेव्हा त्यांना कोर्टात जाण्याचा सल्ला देण्यात आला. यावर ते म्हणाले की कोर्टात जेवढा वेळ खर्च होईल, तेवढ्या वेळात मी अजून जहाल नवीन नाटक लिहीन. बालगंधर्व खाडिलकरांना गुरू मानत असत. गंधर्वांसाठी खाडिलकरांनी “स्वयंवर” “मानापमान” “द्रौपदी” “मेनका” “सावित्री” “विद्याहरण” अशा कधीही न आटणाऱ्या कामधेनुच अर्पण केल्यात ! एखाद्या स्त्रीप्रमाणेच बालगंधर्वांनासुद्धा वाढत्या वयाची चिंता होती. त्यावर खाडिलकर म्हणाले होते, “तू चिंता करू नकोस. मी तुझ्यासाठी ‘देवकी’ नाटक लिहीन. तू कितीही म्हातारा झालास तरी आठ मुलांची आई नक्कीच शोभशील!” दुर्दैवाने हे नाटक काही लिहून झालंच नाही!

ब्रिटिशांविरुद्ध काकासाहेब आपल्या जहाल भाषणातून तरुणांना सदोदित जागृत करीत. एकदा काकासाहेब खाडिलकर लोकमान्यांच्या आदेशावरून कौलांचा कारखाना काढण्याच्या आवरणाखाली, क्रांतिकारकांसाठी पिस्तुलांचा कारखाना काढण्यासाठी जीवाची पर्वा न करता नेपाळला गेले. ‘कौले बनवण्यातील तज्ज्ञ’ म्हणून त्यांनी नेपाळमध्ये प्रवेश मिळवला. पण कौले काही जमेनात..!! आपल्या आत्मनिवेदनात ते म्हणतात, शेवटी मी ईश्वराचा धावा केला. मी राष्ट्रकार्य करीत असल्याने ईश्वर धावून येईल अशी मला श्रद्धा होती. भट्टी लावताना काळजी घेतल्याने म्हणा किंवा ईश्वरी आशीर्वादाने म्हणा भट्टी जमली!

त्यांच्या या कारखान्यात तब्बल ४०० कामगार होते! पण या कटाचा इंग्रजांना सुगावा लागून सगळा डावच फिसकटला…
खाडिलकरांना कुठलीही मान मान्यता सहजपणे लाभली नाही..!! अवमान सोसून निकराने लढत त्यांना पुरुषार्थ सिद्ध करावा लागला. आजही त्यांच्या ‘स्वयंवर’, ‘मानापमान’, ‘विद्याहरण’ ई. नाटकांचे हाऊसफुल प्रयोग होत असतात. आमचे मित्र श्री. सुबोध भावे त्यांच्या ‘मानापमान’ नाटकावर आधारित सिनेमा बनवत आहेत, त्यांना खूप शुभेच्छा! मात्र तरीही इतक्या अष्टपैलू झुंजार स्वातंत्र्यसैनिक नाट्याचार्यांच्या १५० व्या जयंतीची आठवण कोणालाही नाही!

नुकत्याच गोव्यात पार पडलेल्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत नव्या रंगकर्मीनी सादर केलेल्या खाडिलकरांच्याच ‘स्वयंवर’ नाटकाने प्रथम पुरस्कार पटकावला! मात्र तरीही नाट्याचार्यांपासून ते आम्हा चौथ्या पिढीतील खाडिलकरांपर्यंत सारेच उपेक्षित, दुर्लक्षित आणि अभागी! अर्थातच हे मराठी संगीत रंगभूमी आणि पत्रकारीतेचं दुर्दैव, की राष्ट्रासाठी अखंड विचार करणाऱ्या क्रांतिकारी पत्रकार आणि तब्बल १५ यशस्वी नाटके लिहिणाऱ्या सर्वाधिक लोकप्रिय नाटककाराची अवहेलना १५०व्या जयंती वर्षातच व्हावी! पण अखेर स्वतः नाट्याचार्य म्हणत तेच खरे.. माझं नाव घेतल्याशिवाय मराठी नाट्यसृष्टीचा विचार करता येणार नाही आणि तेवढे मला पुरेसे आहे!

म्हणूनच समस्त महाराष्ट्राच्या वतीने प्रणाम करून म्हणावसं वाटतं… ।।शुरा मी वंदिले।।

डॉ. वीणा खाडिलकर

vtkhadilkar@gmail.com

Web Title: National dramatist natyacharya krishnaji prabhakar khadilkar nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2022 | 06:00 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.