Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

1 ऑक्टोबरपासून होणार 10 मोठे बदल, वाचा… सणासुदीच्या काळात तुमच्या बजेटवर काय परिणाम होणार?

पुढील महिन्यापासून म्हणजे 1 ऑक्टोबरपासून अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार आहे. गॅस सिलिंडरचे दर, आधार कार्ड, रेल्वेची विशेष तिकीट तपासणी मोहीम, पोस्ट ऑफिस खात्यावरील व्याज दर, सीएनजी आणि पीएनजीचे दर बदलतील, बोनस शेअर्सचे T+2 नियम असे अनेक बदल होणार आहेत.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 28, 2024 | 07:21 PM
1 ऑक्टोबरपासून होणार 10 मोठे बदल, वाचा... सणासुदीच्या काळात तुमच्या बजेटवर काय परिणाम होणार?

1 ऑक्टोबरपासून होणार 10 मोठे बदल, वाचा... सणासुदीच्या काळात तुमच्या बजेटवर काय परिणाम होणार?

Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या नियमांमध्ये बदलत होत असतो. पुढील महिन्यापासून म्हणजे 1 ऑक्टोबरपासून देखील अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार आहे. आता सप्टेंबर संपत आला असून, ऑक्टोबर महिना सुरू होणार आहे. या काळात गॅस सिलिंडर आणि आधार कार्डपासून ते अल्पबचत योजनेपर्यंत अनेक नियम बदलणार आहेत.

गॅस सिलिंडरचे दर – एलपीजी सिलिंडरची किंमत दर महिन्याच्या 1 तारखेला बदलली जाते. तेल विपणन कंपन्या या वेळीही 1 ऑक्टोबरपासून नवीन दर लागू करतात. सणासुदीच्या काळात तुम्हाला स्वस्त गॅस सिलिंडरची भेट दिली जाण्याची अपेक्षा आहे.

आधार कार्ड – आता 1 ऑक्टोबरपासून तुम्ही पॅन कार्ड किंवा इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्यासाठी आधार नाव नोंदणी आयडी वापरू शकणार नाही. आयकर कायद्याच्या कलम 139AA अंतर्गत पॅन कार्ड किंवा आयटीआरसाठी आधार क्रमांक देणे आवश्यक असणार आहे.

रेल्वेची विशेष तिकीट तपासणी मोहीम – 1 ऑक्टोबरपासून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात रेल्वे विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू करणार आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढल्याने ही कारवाई करण्यात येत आहे.

हे देखील वाचा – गुंतवणुकदारांचे पैसे होणार दुप्पट! ‘हा’ आयपीओ तब्बल 200 पट अधिक सबस्क्राइब; ग्रे मार्केट प्रीमियम 120 टक्क्यांच्या पुढे…

पोस्ट ऑफिस खात्यावरील व्याज दर – पोस्ट ऑफिस खात्यावरील व्याजदरही 1 ऑक्टोबरपासून बदलणार आहेत. नॅशनल स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम खात्यांवरील व्याजदरातील बदल तुमच्या व्याज उत्पन्नावर परिणाम करू शकतात.

सीएनजी आणि पीएनजीचे दर बदलतील – दर महिन्याच्या पहिल्या दिवशी, ऑइल मार्केटिंग कंपन्या (OMCs) ATF, CNG आणि PNG चे दर बदलतात. सप्टेंबरमध्ये एटीएफच्या दरात कपात करण्यात आली होती.

बोनस शेअर्सचे T+2 नियम – सेबीने बोनस शेअर्सचे ट्रेडिंग सुलभ करण्यासाठी एक नवीन फ्रेमवर्क तयार केले आहे. 1 ऑक्टोबरपासून बोनस शेअर्सचे ट्रेडिंग T+2 पद्धतीने होईल. यामुळे रेकॉर्ड डेट आणि ट्रेडिंगमधील वेळ कमी होईल. याचा फायदा भागधारकांना होईल.

लहान बचत योजनांचे नियम बदलले – वित्त मंत्रालयाने राष्ट्रीय लघु बचत योजना अंतर्गत चुकीच्या पद्धतीने उघडलेल्या खात्यांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता PPF आणि सुकन्या समृद्धी सारखी खाती वित्त मंत्रालयाकडून नियमित केली जातील. यामुळे भविष्यात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

हे देखील वाचा – 17 वेळा ठरला अपयशी, तरीही नाही मानली हार; आकाश, ईशा अंबानी यांना पिछाडी देत बनलाय सर्वात मोठा करोडपती!

सुरक्षा व्यवहार करामध्ये वाढ – फ्युचर्स अँड ऑप्शन्स (F&O) ट्रेडिंगवरील सुरक्षा व्यवहार कर (STT) मध्ये देखील बदल होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून, पर्यायांच्या विक्रीवरील STT 0.1 टक्क्यांपर्यंत वाढेल, जो पूर्वी 0.0625 टक्के होता. त्यामुळे व्यापाऱ्यांना खरेदी-विक्रीच्या पर्यायांमध्ये काही अतिरिक्त खर्च सहन करावा लागणार आहे. याचा परिणाम डेरिव्हेटिव्ह बाजारावर होणार आहे.

वाद से विश्वास योजना सुरू करण्यात येणार – CBDT ने जाहीर केले आहे की ‘विवाद से विश्वास योजना 2024’ 1 ऑक्टोबरपासून लागू केली जाईल. त्याच्या मदतीने आयकराशी संबंधित वाद मिटवले जातील. न्यायालये आणि न्यायाधिकरणांसमोर प्रलंबित प्रकरणे निकाली काढली जातील.

HDFC क्रेडिट कार्ड लॉयल्टी प्रोग्राममध्ये बदल – एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डच्या लॉयल्टी प्रोग्राममध्ये 1 ऑक्टोबरपासून बदल होणार आहे. नवीन नियमानुसार, HDFC बँकेने SmartBuy प्लॅटफॉर्मवरील Apple उत्पादनांसाठी रिवॉर्ड पॉइंट्सची पूर्तता प्रति कॅलेंडर तिमाही एका उत्पादनापर्यंत मर्यादित केली आहे.

Web Title: 10 big changes from october 1 your budget be affected during the festive season

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2024 | 07:21 PM

Topics:  

  • aadhaar card
  • Budget
  • new rules

संबंधित बातम्या

LPG सब्सिडी ते UPI चे नियम…! १ ऑगस्टपासून तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम! खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
1

LPG सब्सिडी ते UPI चे नियम…! १ ऑगस्टपासून तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम! खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा

१ ऑगस्टपासून UPI, LPG, क्रेडिट कार्डसह ‘हे’ महत्वाचे नियम बदलणार, जाणून घ्या
2

१ ऑगस्टपासून UPI, LPG, क्रेडिट कार्डसह ‘हे’ महत्वाचे नियम बदलणार, जाणून घ्या

ऑनलाईन कॅब बुक करणाऱ्यांनो लक्ष द्या ! ‘या’ वेळी Ola Uber दुप्पट भाडं आकारणार, सरकारने दिली परवानगी
3

ऑनलाईन कॅब बुक करणाऱ्यांनो लक्ष द्या ! ‘या’ वेळी Ola Uber दुप्पट भाडं आकारणार, सरकारने दिली परवानगी

१ जुलैपासून होणार ‘हे’ मोठे बदल, तुमच्या खिशावर होईल मोठा परिणाम; जाणून घ्या
4

१ जुलैपासून होणार ‘हे’ मोठे बदल, तुमच्या खिशावर होईल मोठा परिणाम; जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.