2025 मध्येही कोसळू शकतो शेअर बाजार; गुंतवणुकीपुर्वी 'या' गोष्टींची काळजी घ्याच..!
भारतीय शेअर बाजारात सलग दुस-या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. आज मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स ९८४.२३ अंकांच्या घसरणीसह ७७,६९०.९५ च्या पातळीवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 324.40 अंकांच्या घसरणीसह 23,559.05 च्या खाली बंद झाला आहे. सेन्सेक्सची ही मागील चार महिन्यांतील निच्चांकी पातळी आहे. मात्र, शेअर बाजारातील घसरणीमागील नेमकी कारणे काय आहेत. हे आपण आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत…
हे देखील वाचा – अनिल अंबानींच्या कंपनीला 2878 कोटींचा नफा; आधी होती कंपनी तोट्यात!
गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटींचे नुकसान
भारतीय शेअर बाजारातील घसरणीमागे प्रामुख्याने देशांतर्गत किरकोळ महागाई वाढणे, परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून निधी काढून घेणे. यामुळे गेले दोन दिवस झालेल्या या घसरणीमुळे मागील दोन दिवसांत भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे तब्बल दोन सत्रांमध्ये 13 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय, बँकिंग, वाहन आणि भांडवली वस्तूंच्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्यामुळे बुधवारी (ता.१३) सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही भारतीय इक्विटी बेंचमार्क निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक घसरलेले दिसून आले.
(फोटो सौजन्य – istock)
हे देखील वाचा – शेअर बाजारातील घसरण सुरुच; सेन्सेक्स 984.23 अंकांनी तर निफ्टी 324.40 अंकांनी घसरला
काय आहेत शेअर बाजारातील घसरणीमागील कारणे
१. परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून निधी काढून घेणे – कमी झालेली कॉर्पोरेट कमाई आणि देशांतर्गत चलनवाढ 14 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर असल्याने विदेशी गुंतवणूकदारांनी मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारातून काढता पाय घेतला.
२. किरकोळ महागाई – देशातील किरकोळ महागाईने रिझर्व्ह बँकेची महागाईची मर्यादा ओलांडली आहे. मुख्यतः अन्नधान्याच्या वाढत्या किमतींमुळे ऑक्टोबरमध्ये 6.21 टक्क्यांचा महागाई दर, 14 महिन्यांच्या शिखरावर पोहोचला आहे. मेहता इक्विटीज लिमिटेडचे वरिष्ठ व्हीपी (संशोधन) प्रशांत तपासे म्हणाले आहे की, “महागाई झपाट्याने वाढल्याने आणि आरबीआयकडून नजीकच्या काळात दर कपातीच्या आशा कमी झाल्यामुळे शेअर बाजार गोंधळात पडला आहे. त्याचाही बाजारावर परिणाम पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा – आरबीआयने एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय बॅंकांचा केला ‘या’ सुचीमध्ये समावेश!
३. क्षेत्रीय निर्देशांक घसरला – शेअर बाजारात सर्वाधिक घसरण ही मिड आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये दिसून आली आहे. तर आर्थिक आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रांनी शेअर बाजारात खुपच कमजोरी दर्शविली आहे. बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक 3.08 टक्क्यांनी घसरला, तर मिडकॅप निर्देशांक 2.56 टक्क्यांनी घसरला आहे.
४. भारतीय रुपयातील घसरण – दरम्यान, अलिकडेच भारतीय रुपयामध्ये मध्ये मोठी घसरण नोंदवली गेली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 84.38 रुपयांपर्यंत वाढला. सतत परकीय निधीचा ओघ देशाबाहेर जाणे आणि देशांतर्गत इक्विटी मार्केटमधील मंदावलेली कामगिरी यामुळे चलनाला दबावाचा सामना करावा लागला आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)