Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

८ वा वेतन आयोग केव्हा लागू होणार? केंद्र सरकारने संसदेत स्पष्टच सांगितले… वाचा सविस्तर!

सध्याच्या घडीला देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना ८ वा वेतन आयोग लागू होण्याची प्रतीक्षा आहे. गेल्या महिनाभरापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू होणार असल्याचे आडाखे देखील बांधले आहे. मात्र, आता आठवा वेतन आयोग केव्हा लागू होणार? या प्रश्नाबाबत केंद्र सरकारने संसदेत स्पष्टपणे उत्तर दिले आहे. सध्या तरी आठवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात कोणताही विचार नसल्याचे केंद्र सरकारने संसदेत म्हटले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 31, 2024 | 08:27 PM
८ वा वेतन आयोग केव्हा लागू होणार? केंद्र सरकारने संसदेत स्पष्टच सांगितले... वाचा सविस्तर!

८ वा वेतन आयोग केव्हा लागू होणार? केंद्र सरकारने संसदेत स्पष्टच सांगितले... वाचा सविस्तर!

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ८ वा वेतन आयोग लागू केला जाणार असल्याची चर्चा रंगली होती. अर्थसंकल्प सादर होण्याआधी याबाबत अनेक यंदाच्या अर्थसंकल्पात ८ व्या वेतन आयोगासाठी तरतूद केली जाणार असल्याचे आडाखे बांधले जात होते. केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता तुम्ही देखील आठवा वेतन लागू होण्याची वाट पाहत असाल तर ही बातमी वाचून तुमचा भ्रमनिरास झाल्याशिवाय राहणार नाही.

राज्यसभा खासदारांच्या प्रश्नाला अर्थराज्यमंत्र्यांचे उत्तर

सध्याच्या घडीला संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून, यात राज्यसभा खासदार रामजीलाल सुमन आणि जावेद अली खान यांनी अर्थमंत्र्यांना ८ वा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात प्रश्न विचारला आहे. आठव्या वेतन आयोगासंदर्भात केंद्र सरकारकडून काय पावले उचलली जात आहे. असे या दोन्ही खासदारांनी अर्थमंत्र्यांना विचारले होते. यावर बोलताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेच्या सभागृहाला माहिती देताना सांगितले आहे की, “सध्या तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही.”

हेही वाचा : लवकरच होणार ‘या’ सरकारी बँकेचे खासगीकरण; केंद्र सरकारकडून प्रक्रियेला गती!

कधीपासून लागू होणे अपेक्षित आहे?

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8 वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. दर 10 वर्षांनी सरकार नवीन वेतन आयोग लागू करते. 7 व्या वेतन आयोगाची स्थापना फेब्रुवारी 2014 मध्ये करण्यात आली होती. तर त्याच्या शिफारशी 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आल्या होत्या. या आधारावर 1 जानेवारी 2026 ही 8 व्या वित्त आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी निश्चित तारीख मानण्यात आली आहे.

हेही वाचा : बांधकाम व्यवसायाला “अच्छे दिन”, सळईचे दर नरमले; घर बांधायचंय… मग आत्ताच ठेवा मागवून!

अनेक दिवसांपासून होतीये मागणी

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ८ वा वेतन आयोग लागू करण्याची मागील केली जात आहे. अलीकडेच रेल्वे कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यासाठी ८ व्या वेतन आयोगाच्या मागणीबाबत कॅबिनेट सचिवांना पत्रही लिहिले आहे. याशिवाय अनेक सरकारी कर्मचारी संघटनांनी केंद्र सरकारकडे वारंवार ८ व्या वेतन आयोगाची मागणी लावून धरली आहे.

Web Title: 8th pay commission government replied in parliament that no proposal front of ministry till now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2024 | 08:27 PM

Topics:  

  • 8th pay commission

संबंधित बातम्या

8th Pay Commission: ₹18000 चा पगार वाढणार ₹44280 इतका, का लागतोय वेळ? 8वा वेतन आयोग ToR च्या जाळ्यात अडकला
1

8th Pay Commission: ₹18000 चा पगार वाढणार ₹44280 इतका, का लागतोय वेळ? 8वा वेतन आयोग ToR च्या जाळ्यात अडकला

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनमध्ये कसा होणार बदल? सरकारी तिजोरीवर किती भार? जाणून घ्या एका क्लिकवर
2

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनमध्ये कसा होणार बदल? सरकारी तिजोरीवर किती भार? जाणून घ्या एका क्लिकवर

8th Pay Commission: 8 वा वेतन आयोग वादाच्या भोवऱ्यात? सरकारी कर्मचाऱ्यांची पंतप्रधानांकडे धाव..; ToR बदलाची मागणी
3

8th Pay Commission: 8 वा वेतन आयोग वादाच्या भोवऱ्यात? सरकारी कर्मचाऱ्यांची पंतप्रधानांकडे धाव..; ToR बदलाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.